म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : ऍमिलॉइडोसिस नावाच्या दुर्मिळ आणि जीवघेण्या आजाराशी झुंजत असलेल्या बुलढाणा येथील रुग्णावर बेलापूर येथील अपोलो रुग्णालयाने यशस्वीरीत्या हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पाडली आहे. दोन वर्षे प्रतीक्षेत असलेल्या या रुग्णाला दक्षिण मुंबईच्या रुग्णालयातील एका ब्रेन-डेड झालेल्या व्यक्तीचे हृदय मिळणार होते. मुंबई आणि नवी मुंबई वाहतूक पोलिसांच्या साहाय्याने ग्रीन कॉरिडॉरद्वारे ४० किमीचे अंतर अवघ्या ४६ मिनिटांत पार करून अपोलो रुग्णालयामध्ये हे हृदय आणण्यात आले. त्यानंतर हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया कोणत्याही गंभीर समस्येशिवाय यशस्वीपणे पार पडली. अपोलो रुग्णालयामध्ये आतापर्यंत झालेली हृदय प्रत्यारोपणाची ही आठवी यशस्वी शस्त्रक्रिया आहे.

हा ४० वर्षीय रुग्ण अपोलो रुग्णालयामध्ये बुलढाणा जिल्ह्यातून आला होता. त्याला छातीत तीव्र वेदना होऊन श्वास घेण्यास त्रास आणि थकवा जाणवत होता. त्याच्या तपासणीनंतर ऍमिलॉइडोसिसमुळे त्याचे हृदय निकामी झाल्याचे आढळून आले. त्यामुळे त्याचे हृदय प्रत्यारोपण करणे हा एकमेव पर्याय होता. त्यामुळे २०२१मध्ये त्याचे नाव हृदय प्रत्यारोपण प्रतीक्षायादीत टाकण्यात आले होते. तेव्हापासून नवीन हृदय मिळेपर्यंत अपोलो रुग्णालयाने या रुग्णाला मागील दोन वर्षे वैद्यकीय आणि आर्थिक पाठबळ दिले.

मोटरमॅन सेवानिवृत्त, आयुष्यातील शेवटची लोकल सोडली; टाळ्यांच्या गडगडाटात प्रवाशांच्या शुभेच्छा

Weather Alert : पावसाचा लपंडाव, राज्यात ३ दिवस तीव्र उष्णतेचा इशारा; तर या जिल्ह्यात कोसळणार पाऊस

४ एप्रिल २०२३ रोजी दक्षिण मुंबईच्या रुग्णालयात ब्रेन-डेड झालेल्या व्यक्तीची माहिती अपोलो रुग्णालयाला मिळाल्यानंतर अपोलोच्या तज्ज्ञ हृदय प्रत्यारोपण पथकाने त्वरित हृदय मिळावले आणि मुंबई आणि नवी मुंबई वाहतूक पोलिसांच्या साहाय्याने दात्याचे हृदय ग्रीन कॉरिडॉरद्वारे ४० किमीचे अंतर अवघ्या ४६ मिनिटांत पार करून अपोलोमध्ये आणण्यात आले. त्यानंतर या रुग्णावर हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया कोणत्याही गंभीर समस्येशिवाय यशस्वीपणे पार पडली. अपोलो रुग्णालयाने या रुग्णाच्या उपचारासाठी ट्रस्ट फंडिंगद्वारे शस्त्रक्रिया आणि उपचारासाठी आर्थिक मदत मिळवून दिली. आयुष्य जगण्याची दुसरी संधी दिल्याबद्दल या रुग्णाने सर्व डॉक्टरांसह पोलिसांचेही आभार मानले आहेत.

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here