पुणे : पुणे पोलीस दलातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. सेवानिवृत्त झालेल्या हवालदाराचा दुसऱ्याच दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या धक्कादायक बातमीनंतर पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.

प्रकाश अनंता यादव असे मृत्यू झालेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. प्रकाश यादव यांच्या निधनामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
Pune News: भावाच्या वाढदिवसाला पुण्यात आल्या; मुंबईतील दोन सख्ख्या बहिणींचा नदीत बुडून मृत्यू
प्रकाश यादव हे बुधवारी (दि. ३१ मे) पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले होते. पुणे पोलीस मुख्यालयात बुधवारी झालेल्या कार्यक्रमात अपर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील आणि पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल यांच्याहस्ते यादव यांचा सत्कार करण्यात आला होता. सेवानिवृत्तीच्या दुसऱ्या दिवशी यादव यांचा मृत्यू झाल्याने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.

तहसीलदारावर कारवाईची मागणी, पुलावर चढून शोले स्टाइल आंदोलन

प्रकाश यादव हे पुणे पोलीस मुख्यालयात सी कंपनीत कार्यरत होते. ते पोलीस जीम ट्रेनर होते. प्रकाश यादव यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू होता. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. प्रकाश यादव यांना पुणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यासंह पोलीस कर्मचाऱ्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

तुमच्या नातेवाईकाचे आताच निधन झाले; फेसबुकवर असा मेसेज दिसल्यास चुकूनही क्लिक करू नका, अन्यथा…

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here