मुंबई : मुंबई विमानतळावर महिलेच्या बॅगेत बॉम्ब असल्याची एकच अफवा सगळीकडे पसरली असून यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. विमानतळावर पोहोचल्यानंतर महिलेने माझ्या बॅगेत बॉम्ब असल्याचं सांगितलं. यामुळे पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली पण या घटनेमागचं नेमकं कारण समोर येताच सगळे हादरले.मिळालेल्या माहितीनुसार, विमानतळ परिसरात पोहोचल्यानंतर महिलेने माझ्याकडे बॉम्ब असल्याचं पोलिसांना सांगितलं. ही महिला मूळची कोलकाता इथली रहिवासी असून तिच्या या अफवेनंतर सीआयएसएफने तात्काळ तिला ताब्यात घेतलं. यानंतर मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मात्र, नंतर तिची जामिनावर सुटका करण्यात आल्याची माहिती आहे.

Weather Alert : पावसाचा लपंडाव, राज्यात ३ दिवस तीव्र उष्णतेचा इशारा; तर या जिल्ह्यात कोसळणार पाऊस
पोलिसांच्या सांगण्यानुसार, आयपीसी कलम ३३६(इतरांची सुरक्षा धोक्यात येण्याची शक्यता असलेलं कृत्य करणं), ५०५-२ (व्यक्तींमध्ये द्वेष, वैर निर्माण होण्याची शक्यता असलेली विधानं करणं) या अंतर्गत महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर महिलेची चौकशी केली असता २९ मे रोजी संध्याकाळी रुची दीपक शर्मा या २९ वर्षीय महिला मुंबई विमानतळावरून कोलकात्याला जाणारी फ्लाइट पकडणार होत्या. त्यांनी स्पाइस जेट बुक केलं होतं. पण बोर्डिंग पास घेण्यासाठी त्या काउंटरवर पोहोचताच त्याच्याकडे एकूण २२.०५ किलो सामान असल्याचं सांगण्यात आले, तर नियमानुसार फक्त १५ किलोच सामान मोफत नेलं जाऊ शकतं.

यानुसार, महिलेकडे एकूण दोन बॅगा होत्या. सर्व सामान नेण्यासाठी त्यांना जादा पैसे द्यावे लागणार होते. पण यासाठी त्या तयार नव्हत्या. त्यामुळे स्पाइस जेटच्या कर्मचाऱ्यांशी त्यांची हाणामारीही झाली. मराठी नसलेल्या लोकांचा अशा प्रकारे छळ केला जातो, असा आरोप महिलेने केला असून यानंतर त्यांनी अचानक बॅगेत बॉम्ब असल्याची घोषणा केली. त्यानंतर लगेचच सीआयएसएफला घटनास्थळी पाचारण करण्यात आलं. तपासादरम्यान महिलेच्या बॅगेत काहीही संशयास्पद आढळलं नाही.

Shahbad Dairy Case: साक्षी मर्डर केसमध्ये मोठी लीड, साहिलच्या क्ररतेचा सगळ्यात मोठा पुरावा पोलिसांच्या हाती…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here