गेल्या आठवड्याभरापासून ७ जणांचा शोध सुरू होता. यामध्ये ३० वर्षांच्या दोन महिला आणि ५ पुरुषांचा समावेश होता. गेल्या महिन्याच्या २० तारखेपासून ७ जण बेपत्ता होते. ते बेपत्ता झाल्याच्या तक्रारी वेगवेगळ्या दिवशी मिळाल्या होत्या. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. बेपत्ता झालेले सातही जण एकाच कॉल सेंटरमध्ये कार्यरत असल्याची माहिती तपासातून उघडकीस आली.
ज्या परिसरात पोलिसांना मानवी अवयव सापडले, त्याच परिसरात बेपत्ता झालेले सात जण काम करत असलेलं कॉल सेंटर आहे. पोलिसांनी फॉरेन्सिक विभागाला पाचारण केलं आहे. पीडितांची संख्या आणि त्यांची ओळख अद्याप तरी पटलेली नाही. कॉल सेंटरमध्ये अवैध कामं चालायची, अशी माहिती प्राथमिक तपासातून उघड झाली आहे. पोलीस अधिकाऱ्यांना घटनास्थळी रक्तानं माखलेले कपडे आणि गांजा सापडल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे.
काही वर्षांपूर्वीच पोलिसांना जलिस्कोच्या विविध भागांमध्ये मानवी अवयव सापडले आहेत. जलिस्कोमधील टोनाला नगरपालिका क्षेत्राच्या हद्दीत २०२१ मध्ये ११ पुरुषांचे अवयव ७० पिशव्यांमध्ये सापडले होते. त्याआधी २०१९ मध्ये जापोपन परिसरातील एका निर्जनस्थळी ११९ पिशव्यांमध्ये २९ जणांचे मृतदेह आढळून आले होते. जलिस्कोमध्ये २०१८ साली तीन विद्यार्थी बेपत्ता झाले होते. त्यांचे मृतदेह ऍसिड टाकून पेटवण्यात आले होते.