अकोला : विदर्भातील अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती तुरीच्या दरात एका दिवसात एक हजार रुपयांची वाढ होत दर अकरा हजार रूपये प्रतिक्विंटल पर्यंत पोहोचले आहेत. तर, अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत काल तुरीला दहा हजार चाळीस रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल प्रमाणे भाव होता. या हंगामात तुरीच्या दरांमध्ये सुरुवातीपासूनच तेजी राहिली आहे. आगमी दिवसात हे दर वाढतच असणार असून तुरीच्या दराने अकोला बाजार समितीत ११ हजारांचा टप्पा गाठला, तर अकोटच्या बाजारात दहा हजारांचा टप्पा गाठला आहे. मात्र, कापसाचे भाव घसरले असून सद्यस्थितीत अकोट बाजारात ७ हजार ८०० रूपयांपर्यत भाव मिळतो आहे.

अकोला बाजारातील असे आहे तुरीचे चित्र :

फेब्रुवारीच्या अखेरीस तुरीच्या दरासंदर्भात कृषी बाजारातील अभ्यासकांनी अंदाज दिला होता की यंदाच्या हंगामात तुरीला चांगली मागणी राहणार , ‘मे’ महिन्याच्या सुरुवातीपासूनच तुरीच्या दरात तेजी राहणार आहे, या अंदाजानुसार अकोला जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ‘२ मे’ रोजी तुरीच्या दरात वाढ होऊन ९ हजारांचा टप्पा गाठला होता. यानंतर तुरीच्या दारात तेजी कायम राहिली आणि सातत्याने दरवाढ होत गेले. आता पुन्हा जून महिन्याच्या सुरुवातीला तुरीच्या दरात मोठ्या प्रमाणात तेजी दिसून येत आहे. ‘मे’ अखेरीस म्हणजेच ३१ तारखेला तुरीला अकोला बाजारात ७ हजार ३०० रूपयांपासून १० हजार रूपयांपर्यत प्रतिक्विंटल प्रमाणे भाव होता.

दुसऱ्या दिवशी म्हणजेच एका दिवसात दरात एक हजार रुपयांनी वाढ होऊन काल १ जूनला तुरीचे दर ८ हजार पासून ११ हजार रूपयांपर्यंत गेले. तर सरासरी भाव ९ हजार ८०० रुपयांपर्यंत होता, अन् तुरीची आवक १ हजार ९०६ इतकी क्विंटल झाली आहे. काल अकोटच्या कृषी बाजारात देखील तुरीला चांगला दर मिळाला. इथं ८ हजार ७५० पासून १० हजार ४० रूपये प्रतिक्विंटल प्रमाणे तुरीला दर होता. आगामी काही दिवसात तुरीचे दर आणखी वाढणार असल्याची शक्यता कृषी बाजारातील बाजार अभ्यासकांनी व्यक्त केली.

Vat Purnima: वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला पिंपळाला प्रदक्षिणा घालत पत्नीपीडित पुरुषांचं देवाला साकडं

कापसाच्या दरात घसरण सुरूच

कापसाच्या दरात मोठ्या प्रमाणावर घसरण कायमच आहे. दररोज ५० ते १०० रुपयांची घसरण होत असून खरीप हंगाम तोंडावर आल्यामुळे शेतकरी कापूस विक्रीसाठी आणत आहेत. मात्र, खर्चाच्या तुलनेत कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्याअपेक्षांवर पाणी फेरलं जात आहे. काल विदर्भातील कापसाची पंढरी म्हणून ओळख असलेले अकोटच्या कृषी बाजारात कापसाला ७ हजार २०० पासून ७ हजार ८०० रूपयांपर्यत भाव मिळत आहे.
Pune News: गड आला पण सिंह गेला! माऊंट एव्हरेस्टची मोहीम फत्ते केल्यानंतर पुण्यातील पोलीस नाईक ब्रेन डेड
दरम्यान, आजही शेकडो क्विटल कापूस शेतकऱ्यांच्या घरातच साठवलेल्या स्थितीत आहे. यंदा किमान ११ हजार किंवा त्यापेक्षा अधिक दर मिळावा, म्हणून शेतकयांनी कापूस विक्री थांबवली होती. मात्र, सध्या कापसाच्या दरवाढीचे चित्र दिसत नाही.
SSC Result 2023: महाराष्ट्र बोर्डाकडून दहावीचा निकाल वेबसाइटवर ऑनलाइन जाहीर, ‘ही’ घ्या थेट लिंक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here