मुंबई: २०११च्या वर्ल्ड कप स्पर्धेत अंतिम सामन्यात (Mahendra Singh Dhoni) ने मारलेला षटकार कोणताही भारतीय चाहता विसरणार नाही. धोनीच्या त्या षटकाराने भारताने २८ वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकला. इतकच नव्हे तर घरच्या मैदानावर वर्ल्ड कप जिंकणारा प्रथमच एखाद्या संघाने वर्ल्ड कप जिंकला होता.

श्रीलंकेविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात जेव्हा भारताचे आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाले तेव्हा वरच्या स्थानावर खेळण्यास आला. त्याने नाबाद ९१ धावांची खेळी केली. सामन्यात धोनीने लंकेचा जलद गोलंदाज नुआन कुलशेखराच्या चेंडूवर षटकार (Dhoni Six in Final of World Cup 2011) मारत वर्ल्ड कप जिंकून दिला.

वाचा-
धोनी मारलेला चेंडू मैदानावरील ज्या जागे(सीट)वर पडला होता त्या सीटला धोनीचे नाव दिले जाण्याची शक्यता आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA)ला मिळालेल्या एका प्रस्ताव मिळाला आहे. ज्यात फायनल मॅचमध्ये षटकार ज्या ठिकाणी पडला होता त्याला धोनीचे नाव द्यावे असे म्हटलेय. गेल्या शनिवारी धोनीने १६ वर्षाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरमधून निवृत्तीचा (MSD Retire) निर्णय घेतला होता.

वाचा-
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य अजिंक्य नाईक यांनी त्या सीटला धोनीचे नाव देण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यांच्या मते ती सीट सजवली जावी. धोनीने मारलेला षटकार ज्या सीटवर पडला होता ती अशा पद्धतीने सजवली जावी की ज्यातून धोनीचे भारतीय क्रिकेटमधील योगदान आणि वानखेडे स्टेडियमशी जोडलेला स्नेह याचा सन्मान व्हावा.

वाचा-
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय क्रिकेटमधील महेंद्र सिंह धोनीच्या योगदानाचा विचार करता २०११च्या वर्ल्ड कपमधील तो प्रसिद्ध सिक्स ज्या ठिकाणी पडला होता. त्या सीटला धोनीचे नाव दिले जाऊ शकते.

वाचा-
नाईक यांनी दिलेल्या प्रस्तावात त्या सीटला रंग देता येईल. जेणेकरून भारतीय क्रिकेटच्या इतिहासात वानखेडे स्टेडियममधील त्या जागेचे महत्त्व उठून दिसेल. या शिवाय MCAच्या क्रिकेट संग्राहलय यात वर्ल्ड कपमधील बॉल ठेवला जावा.

वाचा-
वर्ल्ड कपमधील तो बॉल कुठे आहे याची माहिती काढली तर चांगले होईल. तो बॉल संग्राहलयाचे आकर्षक ठरेल, असे नाईक यांनी लिहलेल्या पत्रात म्हटले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here