नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये श्रद्धा मर्डर केस आणि साक्षी मर्डर केस ताजे असतानाच आता आणखी एका दुहेरी हत्याकांडाने दिल्लीला हादरवून सोडलं आहे. इथं पूर्व दिल्लीमध्ये राहत्या घरात आई आणि मुलीचा मृतदेह गेल्या ७ दिवसांपासून पडून असल्याची माहिती समोर आली आहे. शेजारच्या कोणालाही याची कल्पनाही नव्हती. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजरानी (६४)आणि त्यांची मुलगी गिन्नी करार (३९)असं मृत आई आणि मुलीचं नाव आहे. गेल्या ७ दिवसांपासून त्यांच्या राहत्या घरातच दोघींचाही मृतदेह पडून होता. जवळपास एक आठवडा उलटून गेला तरी याची कोणालाही माहिती नव्हती. बुधवारी संध्याकाळी पोलिसांचं पथक फ्लॅटमध्ये गेले असता घटना पाहून सगळ्यांना धक्का बसला.

Shahbad Dairy Case: साक्षी मर्डर केसमध्ये मोठी लीड, साहिलच्या क्रूरतेचा सगळ्यात मोठा पुरावा पोलिसांच्या हाती…

शेजाऱ्यांनी अख्खी इमारत स्वच्छ केली पण दुर्गंधी गेली नाही…

कृष्णा नगर परिसरातल्या ४ मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून शेजाऱ्यांना उग्र वास येत होता. आजूबाजूच्या लोकांना वाटलं की कदाचित उंदीर मेला असेल किंवा गटार लाईनचं झाकण उघडं ठेवलं असेल. यामुळे घरातल्या लोकांनीही संपूर्ण बिल्डिंग साफ करून घेतली. पण तरीदेखील उग्र वास काही गेला नाही. यानंतर त्यांना पहिल्या मजल्यावर काहीतरी गडबड असल्याची शंका आली, यामुळे तातडीने पोलिसांना पाचारण करण्यात आलं.

Crime News: पोटच्या लेकीवर २५ वेळा चाकूने वार, पत्नी दिसताच बोटं कापली; बापाचा संताप ठरलं झोपेचं ठिकाण…
इमारतीच्या वरच्या मजल्यावर राहणारे विकास जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी चारही मजले साफ केले होते. मजला, लिफ्ट, पार्किंग एरिया आणि टेरेस देखील स्वच्छ करण्यात आले. त्यानंतरही दुर्गंधी येत राहिल्याने प्रथम आरडब्ल्यूए व नंतर पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठलं असता त्यांना खोलीमध्ये आई आणि मुलीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले.

आजूबाजूचे लोक सांगतात की, आई-मुलगी बहुतेक वेळा खोलीतच असायची आणि शेजाऱ्यांशी फार कमी बोलायचे. अनेकदा त्यांच्या घरातून भांडणाचाही आवाज यायचा. अनेकदा मारामारीही झाली होती. इतकंच नाहीतर वृद्ध महिला ही वारंवार त्यांच्या घरी काम करणारी मोलकरीण बदलत असायची, असंही शेजाऱ्यांनी सांगितलं.

रात्री उशिरा यायचे डिलिव्हरी बॉईज…

इमारतीतील रहिवासी नरेंद्र जैन यांनी पोलिसांना सांगितलं की, फ्लॅटमध्ये रंगकाम करण्यासाठी काही लोकांना कामावर ठेवण्यात आलं होतं. मागच्या दिवाळीत रात्रीचं हे काम सुरू व्हायचं. यावेळी डिलिव्हरी बॉय हा रात्री उशिरा आमच्या घराची बेल वाजवायचा. मग आम्हाला त्याला पहिल्या मजल्यावर जा असं सांगावं लागायचं.

Crime Diary: साहिल, प्रविण अन् अजय; प्रेमाचं जाळं खूनापर्यंत गेलं; साक्षी मर्डर केसची स्टार्ट टू एण्ड कहाणी

शेजाऱ्यांनी सांगितली धक्कादायक माहिती…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजरानी यांचे पती हुकुम चंद यांचे २०११ मध्ये निधन झालं होतं. ते लोकसभा प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करत होते. त्याला तीन मुली आहेत. दोघी विवाहित असून गांधी नगर आणि गाझियाबादमध्ये आपल्या कुटुंबासह राहतात. तर पतीच्या निधनानंतर, राजरानी आणि गिन्नी २०१९ मध्ये रोहिणीहून कृष्णा नगर येथील ई-ब्लॉकमध्ये राहण्यासाठी आल्या. संबंधित इमारतीमध्ये राहण्यास येऊन माय-लेकींना ४ वर्ष झाली होती तरी शेजाऱ्यांना त्यांच्याबद्दल फारशी माहिती नव्हती. तर मुलीला ऑटिझमचा त्रास होता. यासाठी थेरपिस्ट यायचे असंही शेजाऱ्यांनी सांगितलं.

१५ वर्षीय चिमुकल्याच्या हत्येचा बनाव रचला, रागाच्या भरात ओढणीने मृतदेह झाडाला टांगला!

मृत राजारानी यांच्याकडे पांढऱ्या रंगाची कार होती. ती कायम पार्किंगमध्ये उभी असायची. महिलेने घराचे दरवाजे ऑटोमॅटिक करून घेतले होते. घराबाहेर सीसीटीव्हीही लावण्यात आला आहे. एका शेजाऱ्याने सांगितले की, त्याने या कुटुंबाच्या घरी कधीही नातेवाईक येताना पाहिले नाहीत. या घटनेमुळे इमारतीमध्ये भीतीचं वातावरण असून पोलीस पुढील तपासात गुंतले आहेत.

सीसीटीव्हीत दिसणारे ते दोघे कोण…

फ्लॅटच्या बाहेरील सीसीटीव्ही तपासला असता यामध्ये ही हत्या असून दोन जणांनी हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. २५ मे रोजी लुटण्याच्या उद्देशाने ते दोघेही आले असावे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन व्यक्ती रात्री १० वाजता आत शिरताना आणि अर्ध्या तासानंतर बाहेर पडताना दिसत आहेत. ते ऑटोरिक्षाने आले होते आणि काही अंतरावर उतरले होते. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, त्यातील एक व्यक्ती पीडितेच्या ओळखीचा होता आणि त्यामुळेच डिजिटल लॉक सिस्टम असल्याने त्यांनी दरवाजा उघडला असावा अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Crime Diary: प्रेयसीचा पती गावी येणार तोच प्रियकराचं प्लॅनिंग, युपीहून मुंबईत आला अन्…; कांदिवली व्यापाऱ्याच्या हत्येचं भयानक सत्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here