रांची : लग्नानंतर अवघ्या २० दिवसात पतीने आपल्या पत्नीला तिच्या प्रियकरासह पळून जाण्यास परवानगी दिली. महिलेची आपल्याशी बळजबरीने लगीनगाठ बांधण्यात आलीये, तिचे दुसऱ्याच पुरुषावर प्रेम आहे, याची जाणीव होताच पतीने हे पाऊल उचलले. झारखंडमधील पालमू जिल्ह्यातील बिचकिला गावात हा प्रकार घडल्याची माहिती आहे. ही घटना वाचून अनेकांना ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटाची आठवण झाली

मनतू पोलीस स्टेशनचे प्रभारी कमलेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिचकिला गावातील रहिवासी सनोज कुमार सिंग याचा विवाह 10 मे रोजी प्रियंका कुमारीसोबत झाला होता. लग्नानंतर प्रियंका खुश नसल्याचं सनोजला जाणवू लागलं. आपल्याच गावात राहणाऱ्या जितेंद्र नामक तरुणाशी तिचे प्रेमसंबंध होते, असं समोजला समजलं.

सध्या आसपासच्या घटना पाहता, पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याची कुणकुण लागल्यास, पती स्वतःच्या जीवाचे बरे वाईट करुन घेत असल्याचे पाहायला मिळते, किंवा पत्नी अथवा तिच्या प्रियकराचे प्राण घेत असल्याची उदाहरणं वाचायला मिळतात. मात्र सनोजने कुणाच्याही जीवाशी किंवा आयुष्याशी खेळ न करण्याचा निर्णय घेतला.

अनैतिक संबंध असल्याचा संशय, रागात त्यानं प्रेयसी आणि मुलांना संपवलं

प्रियंका आणि जितेंद्र गेल्या दहा वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, वेगळ्या जातीचा असल्याच्या कारणावरुन दोघांच्या लग्नाना कुटुंबीयांनी विरोध केला होता.

मधुचंद्राला बायकोचा नकार, नाशिकच्या नवरदेवाने खडसावतच म्हणाली, दोनदा लग्न झालंय, तुमचे…
आपल्या प्रियकराच्या विरहात दु:खी असलेल्या नववधूने जितेंद्रसोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला. सनोजशी लग्न झाल्यानंतर २० दिवसांनी ते पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. त्याच वेळी ग्रामस्थांनी त्यांना रंगेहाथ पकडून मनतू पोलीस ठाण्यात नेले.

Guys Kissing Video Viral : धावत्या स्कूटरवर दोन तरुणांचा रोमान्स, अश्लील चाळे व्हिडिओत कैद
या घटनेची माहिती देण्यासाठी जेव्हा पती आणि त्याच्या कुटुंबीयांना पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले तेव्हा पतीने पत्नीच्या तिच्या प्रियकराशी असलेल्या नातेसंबंधाला पाठिंबा दर्शवला. दोघांनी लग्न करण्यास कोणताही आक्षेप नसल्याचे सांगितले. यामुळे साहजिकच तीनही जीव सुखी झाले.

विवाहितेला लॉजवर बोलवून गळा चिरला, शेवटचा सेल्फी ठरला टर्निंग पॉईंट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here