मुंबई (भाईंदर) : उत्तन समुद्रकिनाऱ्यावर एका ट्रॅव्हल बॅगेत मुंडक नसलेल्या एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या संपूर्ण घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सदर मृतदेह ताब्यात घेतला असून या प्रकरणी अधिक तपास उत्तन सागरी पोलीस करत आहेत.

भाईंदरच्या पश्चिमेस असलेल्या उत्तन समुद्रकिनारी आज सकाळी काही स्थानिक नागरिकांना एक अज्ञात बॅग निदर्शनास आली. त्यानंतर नागरिकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच उत्तन सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि घटनास्थळाची पाहणी करून सदर बॅग उघडून पाहिली असता त्यात मुंडक नसलेला आणि फक्त महिलेचा मृतदेह पोलिसांना आढळून आला.

SSC Result 2023: महाराष्ट्र बोर्डाकडून दहावीचा निकाल ऑनलाइन पाहा, ‘ही’ घ्या थेट लिंक
अल्फा कंपनीच्या ट्रॅव्हल बॅगेत हा मृतदेह आढळून आला असून मृत महिलेच्या हातावर त्रिशूल आणि ओम नावाचा टॅटू गोंदवलेला आहे. आढलेळेला मृतदेह हा २५ ते ३० वयोगटातील महिलेचा असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या महिलेचं मुंडक बॅगेत आढळून आलेले नसून सदर महिलेचे फक्त शीर असलेला भागच आढळून आल्याने महिलेची ओळख पटवण्याचे मोठे आवाहन पोलिसांसमोर आहे.

महिलेचा मृतदेह असलेली ही बॅग नेमकी आली कुठून? ही महिला कोण आहे? ही हत्या कोणी केली? याबाबतचा शोध पोलीस घेत आहेत. त्याचप्रमाणे २५ ते ३० वर्षाची महिला बेपत्ता असल्यास उत्तन सागरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांमार्फत करण्यात आले आहे.

उद्धव ठाकरेंचा हा निष्ठावंत कचाट्यात! मुख्यमंत्री शिंदे आणि राणेंचा राजकीय गेम प्लॅन उघड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here