नवी दिल्ली: पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी सर्व राजकीय पक्षांकडून सुरु झाली आहे. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्ष भाजपला पराभूत करण्याची रणनिती तयार करत आहेत. विरोधी पक्षांना एकत्र आणण्याची तयारी सुरु आहे आणि त्यासाठी प्रयत्न देखील सुरू आहेत. भारतातील विरोधी पक्षांच्या ऐक्यावर वॉशिंग्टनमध्ये बोलताना राहुल गांधी म्हणाले, विरोधी पक्षांचे ऐक्य २०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करेल.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांना भेटत आहेत. विरोधी पक्षाची रणनिती ठरवण्यासाठी बिहारमध्ये एक बैठक होणार आहे. विरोधी पक्षातीलस नेत्यांच्या मते जर सर्व जण एकत्र लढलो तर भाजपचा पराभव होऊ शकतो. २०२४ची रणनिती तयार होत आहे, पण २०१९च्या निवडणुकीकडे पाहिले तर ती फक्त भाजप विरुद्ध अन्य अशी नव्हती. निवडणुकीचे विश्लेषण केले तर लक्षात येईल की अनेक राज्यात फक्त प्रादेशिक पक्षांचा दबदबा आहे. भाजप आणि काँग्रेस कुठेच नाही. त्याच बरोबर अशा अनेक जागा आहेत जेथे फक्त भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत झाली. जाणून घेऊयात ५४३ जागांचे संपूर्ण समीकरण…

MS Dhoni: धोनी मुंबई इंडियन्सकडून खेळत असता; IPLच्या एका नियमामुळे MSD चेन्नईचा झाला
१) भाजप विरुद्ध काँग्रेस (१६१ जागा)
१२ राज्य आणि ३ केंद्रशासित प्रदेश ज्यात लोकसभेच्या १६१ जागा आहेत. या ठिकाणी भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत पाहायला मिळाली होती. यापैकी १४७ जागांवर दोघांमध्ये लढत होती. तर १२ जागांवर प्रादेशिक पक्षांनी या दोन राष्ट्रीय पक्षांना आव्हान दिले होते. २ जागांवरील लढत प्रादेशिक पक्षात होती. यात मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात, राजस्थान, आसम, छत्तीसगड, हरियाणा या राज्यांचा समावेश आहे. या ठिकाणी भाजपला १४७ जागांवर, काँग्रेसला ९ तर अन्य पक्षांना ५ जागा मिळाल्या.

२) भाजप विरुद्ध प्रादेशिक पक्ष (१९८ जागा)
उत्तर प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिसा या पाच राज्यातील लोकसभेच्या १९८ जागांवर भाजप आणि प्रादेशिक पक्ष अशी लढत होती. १५४ जागांवर भाजप आणि प्रदेशिक पक्ष अशी थेट लढत होती. २५ जागांवर काँग्रेस आणि प्रदेशिक पक्ष तर १९ जागांवर प्रादेशिक पक्षांमध्ये लढत दिसली. बंगालच्या ४२ पैकी ३९ जागांवर भाजप पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर होती. गेल्या निवडणुकीत भाजपला १९८ पैकी ११६, काँग्रेसला ६ तर अन्य पक्षांना ७६ जागांवर विजय मिळाला होता.

IPL 2023च्या फायनलमधील गुजरातचा पराभव आधीच ठरला होता; कारण जो खेळाडू…

३) काँग्रेस विरुद्ध प्रादेशिक पक्ष (२५ जागा)
२०१९च्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष केरळ, लक्षद्वीप, नागालँड, मेघालय आणि पँडेचेरी येथील २५ पैकी २० जागांवर पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर होती. येथील लढाईत भाजप कुठेच नव्हती. केरळमधील एका जागेवर भाजप दुसऱ्या क्रमांकावर होती. येथील १७ जागांवर काँग्रेसला विजय मिळाला तर ८ जागांवर अन्य पक्षांनी बाजी मारली.

४) येथे कोणीही बाजी मारू शकते (९३ जागा)
लोकसभा निवडणुकीत सहा राज्ये अशी आहेत ज्यातील ९३ जागंवर सर्व पक्षात लढाई दिसते. या ९३ जागांवर भाजप, काँग्रेस आणि प्रादेशिक पक्षांचे ताकद आहे. महाराष्ट्र हे त्याचे उत्तम उदाहरण होय. जेथे भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष मजबूत आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपने या ९३ पैकी ४० जागांवर, काँग्रेसने १२ तर अन्य पक्षांना ४१ जागांवर विजय मिळवला होता.

WTC 2023 Final: फायनल मॅचच्या आधी संघ निवडीवरून गोंधळ; अंतिम ११ मध्ये कोणाला संधी देणार?

५) फक्त प्रादेशिक पक्षांचा दबदबा (६६ जागा)
तामिळनाडू, आंध्र प्रदेश, मिझोराम आणि सिक्किम येथील लोकसभेच्या ६६ जागांवर फक्त प्रादेशिक पक्षांचा दबदबा आहे. तामिळनाडूतील ३९ जागांवर फक्त १२ जागांवर काँग्रेस अथवा भाजपला थोडा आधार होता. याचे कारण आघाडी किंवा युती होती. वरील ६६ पैकी ५८ जागांवर अन्य पक्षांनी तर ८ जागांवर काँग्रेसने विजय मिळवला होता. भाजपला एकही जागा मिळाली नव्हती.

वरील पाच मुद्द्यांवरून हे स्पष्ट होते की लढत ही फक्त भाजप विरुद्ध अन्य अशी नाही. तर विरोधी गटात असलेल्या पक्षांमध्ये देखील लढत आहे.

मोदींनी खलिस्तानी समर्थकांसाठी कारवाईचे आदेश दिले, पंतप्रधान अल्बानीज यांनीही शब्द पाळला!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here