अंबरनाथ : ठाकरे गटाचे कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख आणि माजी आमदार सुभाष भोईर यांनी कल्याण लोकसभेची जागा लढवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केल्याचं पाहायला मिळतंय. कारण एकीकडे महाविकास आघाडीत ठाणे आणि कल्याणची जागा ठाकरे गटाला सोडण्याच्या हालचाली सुरू असतानाच दुसरीकडे कल्याण लोकसभेतील अंबरनाथ शहरात सुभाष भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या बॅनर्सवर भोईर यांचा ‘भावी खासदार’ असा उल्लेख करण्यात आला आहे.

सुभाष भोईर हे २०१४ साली कल्याण ग्रामीण विधानसभेतून शिवसेनेच्या तिकिटावर आमदार झाले होते. मात्र २०१९ सालच्या निवडणुकीत त्यांचं तिकीट कापत केडीएमसीचे नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांना संधी देण्यात आली होती. त्या निवडणुकीत रमेश म्हात्रे यांचा पराभव होऊन मनसेचे राजू पाटील हे आमदार म्हणून निवडून आले होते. आपलं तिकीट कापलं गेल्याने सुभाष भोईर हे एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर नाराज असल्याची चर्चा होती. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर सुभाष भोईर यांनी मात्र ठाकरे गटातच राहणं पसंत केलं होतं. इतकंच नव्हे, तर कल्याण लोकसभेचं संपर्कप्रमुखपद देखील त्यांना देण्यात आलं होतं.महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ठाणे आणि कल्याण या लोकसभेच्या दोन जागा ठाकरे गटाला सोडल्या जाण्याची शक्यता आहे.त्यामुळेच सुभाष भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथ शहरात लावलेल्या बॅनर्सवर त्यांचा ‘भावी खासदार’ असा उल्लेख करण्यात आला आहे.

उद्धव ठाकरेंचा हा निष्ठावंत कचाट्यात! मुख्यमंत्री शिंदे आणि राणेंचा राजकीय गेम प्लॅन उघड

कल्याण लोकसभा आता कोण लढवणार अशी चर्चा आता कल्याण – डोंबिवली – अंबरनाथ परिसरात सुरु झाली आहे. कल्याण शिवसेनेचा बालेकिल्ला असून तो अबाधित ठेवण्यासाठी दोन्ही गटाकडून प्रयत्न सुरू आहेत. शिंदे गट व भाजपची युती असल्याने या मतदारसंघावर भाजपने दावा दाखविल्यास सध्याचे विद्यमान खासदार डॉ. शिंदे हे ठाण्यातून निवडणूक लढवून भाजपला ही जागा देण्याची शक्यता आहे.तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री आणि भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी दोनदा कल्याण लोकसभेचा दौरा केला. त्यामुळे ही जागा भाजप लढवू शकते अशी चर्चा असून डोंबिवली विद्यमान आमदार आणि मंत्री रविंद्र चव्हाण यांना उमेदवाऱी दिली जाऊ शकते असे राजकीय जाणकारांचे मत आहे.या मतदारसंघावर भाजपाने आपले लक्ष केंद्रीत केल्यानंतर महाविकास आघाडीने देखील या ठिकाणी चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीकडून आनंद परांजपे यांच्या नावाची चर्चा होत असतानाच ठाकरे गटाकडून माजी आमदार सुभाष भोईर यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.

मोदींचा पराभव शक्य आहे? विरोधक एकत्र आले तर BJPचा पराभव होईल? २०१९च्या निकालात दडलंय सत्य

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आखणी करण्यास सुरुवात केली आहे. मतदारसंघात आढावा बैठका घेत पक्षाचे मजबुतीकरण करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी आपली कंबर कसली आहे. जागा वाटपाच्या चर्चा सध्या सुरु असून त्या जागांवर आपली वर्णी लावण्यासाठी इच्छुकांमध्ये ही चढाओढ लागली असल्याचे दिसते. कल्याण लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून मुख्यमंत्र्यांचे सुपूत्र खासदार डॉ.श्रीकांत शिंदे हे याचे प्रतिनिधीत्व करतात. डॉ.श्रीकांत शिंदे यांनी आपल्या मतदार संघात विकास कामांवर भर दिल्याचे दिसून येते. त्यामुळे कल्याण मतदार संघावरील दावा सोडणार नाहीत असेच सध्या दिसून येत आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण लोकसभा मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या मतदार संघात सहा विधानसभा क्षेत्र असून सहापैकी तीन जागांवर भाजपाचे वर्चस्व आहे.कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचे तर अंबरनाथ मध्ये शिवसेना तर कळवा मुंब्रामध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे.

मनात ठरवलंच होतं राष्ट्रवादीचा अध्यक्ष मीच, पण काकांनी हवा काढून टाकली, श्रीकांत शिंदेंची अजितदादांवर टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here