पुणे : पुण्यातील पुरंदर तालुक्यातील सासवड – कापूरहोळ रस्त्यावर असणाऱ्या नारायणपूर येथे एक चारचाकी आणि दुचाकीचा अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. रस्त्याच्या विरुद्ध बाजूने येऊन कार चालकाने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

शिवाजी पोमण (वय ४८), भीमराव लक्ष्मण कांबळे (वय ६५) असं अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नाव आहेत. याबाबत कृष्णा चंद्रकात पोमण यांनी फिर्याद दिली आहे. शिवाजी पोमण हे नारायणपूर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी साधारण ९ वाजता मौजे शेटेमळा सासवड गावच्या हद्दीत नारायणपुर ते सासवड रोडवर एर्टिगा क्रमांक एमएच १३ डीइ ५४६८ आणि दुचाकी क्रमांक एमएच १२ बीआर ९९६८ या दुचाकीवरून जात असताना अपघात झाला.

Shirdi Sai Baba : शिर्डी साईबाबा संस्थानचा मोठा निर्णय, द्वारकामाई मंदिर दर्शन वेळेत बदल
या अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या दोघे शिवाजी पोमण आणि भीमराव कांबळे हे दोघेही गंभीर जखमी झाले होते. त्यांना स्थानिक नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले. मात्र, रक्तस्राव अधिक झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कारचालकाने भरधाव वेगाने गाडी चालवत असल्याने आणि विरुद्ध दिशेने येत असल्याने हा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. त्याच्याविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या अपघातात दुचाकीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालं असून कारचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. या घटनेनं मृतांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

एकाच घरात राहिले, एकत्रच अभ्यास केला, एक मार्क इकडे की तिकडे नाही, अगदी सेम टू सेम…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here