Nashik Crime News:  नाशिक शहरात लाचखोरीच्या घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. रोजच घडणाऱ्या घटनांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांचे पितळ उघडे पडत आहेत. अशातच दोन लाचखोर सरकारी कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत. 

पहिली घटना ही इगतपुरी तालुक्यातील आधारवड गावात समोर आली आहे. आधारवड ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकास लाच घेताना एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. रमाई घरकुल योजनेचा प्रस्ताव देऊन घराची मंजुरी आणली म्हणून त्याने 5 हजाराची मागितलेली लाच त्याच्या चांगलीच अंगलट आली आहे. घरकुलाला मंजुरी आणून दिल्याच्या मोबदल्यात एका तक्रारदाराकडून 5 हजार रुपयांची लाच स्वीकारताना अधरवड ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक हंसराज श्रावण बंजारा या ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सापळा रचून रंगेहात अटक केली.

दरम्यान घरकुलाच्या प्रस्तावाला मंजुरी आणून देऊन घरकुलाचे शासकीय हप्ते विनाअडथळा बँक खात्यावर जमा करायचे होते. या कामाच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून 5 हजार रुपयांची लाच ग्रामसेवक हंसराज बंजारा याने स्वीकारली. म्हणून त्याच्या यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. 

दुसरी घटना एका पोलीस कर्मचाऱ्यांबाबत घडली आहे. गुन्ह्यात आरोपीविरुद्ध वाढीव कलम लावून कारवाई करण्यासाठी तक्रारदाराकडून 10 हजार रुपयांची लाच घेताना पोलीस हवालदारास गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. हरी जानू पालवी असे अटक केलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. हरी पालवी यांची नेमणूक चांदवड पोलीस ठाण्यात आहे. 59 वर्षीय तक्रारदारांचे त्यांच्या भावासोबत शेतजमिनीच्या वहीवाटीवरून वाद झाला. 

news reels reels

याप्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात तक्रारदार व त्यांच्या भावाविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. तक्रारदाराकडून दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपीविरुद्ध वाढीव कलम लावून कारवाईसाठी पालवी यांनी गुरुवारी 20 हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडी अंती पहिला हप्ता 10 हजार गुरुवारी देण्याचे ठरले. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तकार दाखल केली. तक्रारदाराकडून 10 हजार रुपये घेताना पथकाने पालवी यास अटक केली.

नाशिकच्या लाचखोर महिला अधिकाऱ्याच्या लॉकरमध्ये ‘सोनेच सोने’, एसीबीच्या तपासात मिळालं घबाड 

काही दिवसांपूर्वी नाशिक (Nashik) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली. नाशिक जिल्हा रुग्णालयानंतर (Nashik Civil Hsopital) महत्वाचे असलेले संदर्भ रुग्णालय या निमित्तांने चर्चेत आले आहे. येथील हिवताप विभागात कार्यरत कर्मचाऱ्याकडून दहा हजारांची लाच (Bribe) स्वीकारताना जिल्हा हिवताप अधिकारी संशयित वैशाली दगडू पाटील यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले होते. पाटील यांच्या घराची व बँक लॉकरच्या झाडाझडतीचे आदेश अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी दिले असता एकूण 81 तोळे सोन्याचे दागदागिण्यांचे घबाड हाती लागल्याने पथकही चक्रावून गेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here