लग्नाचे विधी सुरू असताना गावातीलच एका तरुणानं नवरदेवाला व्हॉट्स ऍपवर काही फोटो पाठवले. त्यानंतर त्यानं नवरदेवाला फोन केला. तुझं व्हॉट्स ऍप चेक कर. ज्या नवरीसोबत तू लग्न करु पाहतो आहेस, ती तुझी नाही, माझी नवरी आहे, असं कॉल करणारा तरुण म्हणाला. ते ऐकून नवरदेवाला धक्काच बसला.
यानंतर नवरदेवानं लगेचच व्हॉट्स ऍप चेक केलं. त्याला एका अज्ञात नंबरवरुन काही फोटो पाठवण्यात आले होते. त्याचे हात पाय थरथरु लागले. होणाऱ्या पत्नीचे आक्षेपार्ह फोटो पाहून त्याला झटका बसला. यानंतर नवरदेव आणि कॉल करणाऱ्या तरुणामध्ये कडाक्याचं भांडण झालं. दोघांनी एकमेकांना धमकी दिली.
आपल्या होणाऱ्या पत्नीचे आक्षेपार्ह फोटो पाहून नवरदेव संतापला. नवरदेव स्टेजवरुन खाली उतरला. हे लग्न होऊ शकत नाही. माझ्यासोबत विश्वासघात झालाय, असं म्हणत त्यानं लग्न मोडलं. वधूच्या कुटुंबियांनी, तिच्या नातेवाईकांनी त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र काहीच उपयोग झाला नाही. नवरदेव लग्न न करताच वरात माघारी घेऊन गेला.