पुणे : वाढदिवस हा प्रत्येकाच्या जीवनातील अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. प्रत्येकजण त्याचा वाढदिवस विविध पद्धतीने साजरा करतो. तसेच १ जून हा वाढदिवस दिन म्हणून साजरा करतात. अनेक लोकांचा वाढदिवस याच दिवशी साजरा केला जातो. दरम्यान पुण्यातील एका गावात एक दोन नाही तर तब्बल ५१ जणांचा वाढदिवस एका अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. या वाढदिवसाची चर्चा संपूर्ण राज्यभर होत आहे. भोर तालुक्यातील म्हाळवडी गावात युवकांच्या कल्पनेतून १ जून वाढदिवस दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे. १ जून रोजी गावातल्या ५१ जणांचा वाढदिवस गावच्या मंदिरात सामुहिकरित्या केक कापून साजरा करण्यात आला.

यावेळी ५१ वाढदिवस असणाऱ्या ५१ जणांमध्ये गावातील १०१ वर्षाच्या आजींसह, २१ महिला आणि ३० पुरुषांचा समावेश होता. केक कापून झाल्यानंतर गावकऱ्यांना भोजन आणि पावनखिंड चित्रपटाची मेजवानी देण्यात आली. वाढदिवसाचा सोहळा पाहून जेष्ठांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते. सध्या म्हाळवडी गावात साजरा करण्यात आलेल्या या वाढदिवसाची पंचक्रोशीत चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. प्राथमिक शाळेत नाव दाखल करताना विद्यार्थ्यांची जन्म तारखेची नोंद केली जाते. मात्र, पुर्वीच्या काळी जन्माच्या नोंदी पालकांकडे नसायच्या. त्यावेळी पालक गुरुजी सांगत, “आमच्या गोठ्यात आता जी गाय आहे ना, ती गटारीला व्यायली होती. तिच्या १० दिवस आधी सख्या जन्मला व्हता. मग बघा, त्याची जन्माची तारीख”, अशी ग्रामीण भागातील परिस्थिती होती.

Shirdi Sai Baba : शिर्डी साईबाबा संस्थानचा मोठा निर्णय, द्वारकामाई मंदिर दर्शन वेळेत बदल
शिक्षकांच्या कृपेमुळे साठीवरील अशा सर्वांची जन्म तारीख १ जून असल्याने महाराष्ट्रात वाढदिवस दिन म्हणून साजरा केला जातो. भोर तालुक्यातील भाटघर धरणांच्या कुशीत वेळवंड खो-यातील आदर्श गाव म्हाळवडी येथे ५१ जणांचा जन्मदिवस १ जून असा नोंदवला गेला होता. त्यानंतर ग्रामस्थांनी एकत्र येत सर्वांचा सामुहिकरित्या गावच्या मंदिरात वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. गावचा उंबरठा २०० असून लोकसंख्या १२६३ एवढी आहे. ग्रामस्थांनी जय्यत तयारी करुन ५१ भाग्यवंताना शुभेच्छा देण्यात आल्या. या वाढदिवस सोहळयात १०१ वर्षीय सगुणाबाई बोडके यांच्यासह २१ महिला आणि ३० पुरुषांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी गावातील जेष्ठ नागरिकांच्या डोळयातून आनंद अश्रू ओघळताना पाहावयास मिळाले. गावचे सरपंच दत्तात्रेय बोडके, सोपान बोडके, साहेब राव बोडके, एकनाथ बोडके, सर्जेराव बोडके, तानाजी बोडके, अण्णा बोडके, दशरथ बोडके, बाजीराव बोडके, उमेश बोडके, ग्रामस्थांच्या सहकार्याने हा सोहळा यशस्वी पार पाडण्यात आला.
Monsoon Alert 2023: अरबी समुद्रातून धडकणार २ तीव्र चक्रीवादळे, या तारखेपर्यंत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here