हैदराबाद: बॅडमिंटन खेळताना एका तरुणाला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही हृदयद्रावक घटना तेलंगणामध्ये घडली आहे. जेव्हा हृदयविकाराचा झटका येऊन हा तरुण कोसळला तेव्हा त्याच्या मित्रांनी त्याला सीपीआर दिला. पण, त्यांचे सारे प्रयत्न निष्फळ ठरले. या घटनेनंतर मृत तरुणाच्या कुटुंबीयांना आणि मित्रांना मोठा धक्का बसला आहे.

बुसा व्यंकट राजा गंगाराम नावाचा तरुण शुक्रवारी सकाळी आपल्या काही मित्रांसह राज्यातील जगित्याला जिल्ह्यातील जगित्याला क्लबमध्ये फिरायला आला होता. काही वेळ मॉर्निंग वॉक केल्यानंतर तो मित्रांसोबत बॅडमिंटन खेळू लागला. पण, तेवढ्यात त्याला हृदयविकाराचा झटका आणि आणि तो जमिनीवर कोसळला. हे पाहून सुरुवातील कोणालाच काही कळालं नाही. मग, त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचं लक्षात आल्यानंतर मित्रांनी त्याला सीपीआर दिला. मात्र, रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

Jalna News: गावकऱ्यांना शंका, पाहिलं तर अख्खा रस्ता हातात आला, जालन्यातील त्या रस्त्याची Inside Story
बुसा हा त्याच्या मित्रांसोबत बॅडमिंटन खेळत होते. सारंकाही चांगलं सुरु होतं. मित्र मजा करत होते. बुसा हा शटलकॉक कधी आपल्याकडे येतोय याची वाट बघत तयार होता. मात्र, तितक्यात त्याचा बॅलेन्स जाऊ लागला आणि तो थेट जमिनीवर कोसळला. जवळच असलेल्या मित्राने त्याला सांभाळण्याचा प्रयत्न केला. इतर मित्रही धावून आले. मित्रांनी त्यांना छातीवर प्रेशर देऊन सीपीआरही दिला. जेणेकरुन त्यांना स्थिर करता येईल. मात्र, त्यांचे सारे प्रयत्न निष्फळ ठरले.

आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका; एअर अ‍ॅम्ब्युलन्सनं लीलावतीमध्ये दाखल

त्यानंतर मित्रांनी तात्काळ त्याला उचललं आणि रुग्णालयाकडे धाव घेतली. मात्र, रुग्णालयात पोहण्यापूर्वीच बुसाचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर बुसा यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर त्याच्या मित्रमंडळीही त्याच्या अशा अचानक जाण्याने शोकसागरात बुडाले आहेत.

Pune Crime: सासरा गर्लफ्रेंडकडे जायला निघाला; सुनेनं हटकताच सात वर्षांच्या नातीसमोर घडलं भयंकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here