रत्नागिरी : जिल्ह्यातील दापोली संचलित ज्ञानदीप विदयामंदिर दापोली शहर (माध्यमिक) ता दापोली जि.रत्नागिरी या शाळेचा एस.एस.सी मार्च २०२३ परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे. प्रशालेने उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. या शाळेचा विद्यार्थी मनिष महेश कोकरे याने शंभर टक्के गुण मिळवून कोकण विभागीय मंडळ रत्नागिरी (बोर्डात) मध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे.

मनिष कोकरे हा विद्यार्थी लहानपणापासूनच अनेक स्पर्धा परीक्षांच्या गुणवत्ता याद्यांमध्ये झळकला आहे. यापूर्वी इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यात पहिला तसेच इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये राज्य गुणवत्ता यादीत अकरावा क्रमांक प्राप्त केला होता. इयत्ता सहावी मध्ये बीडीएस परीक्षेमध्ये संपूर्ण देशांमध्ये शंभर पैकी १०० गुण मिळवून प्रथम आला होता.

तसेच विज्ञान प्रदर्शनासह अन्य उपक्रमांतही त्यांने यापूर्वी यश मिळविले आहे. मनीष कोकरे याने पुढील करिअर हे मेडिकल सायन्समध्ये करण्याचे निश्चित केले असून त्यासाठी तो लातूर येथे पुढील शिक्षणासाठी गेला आहे. मनीषची आई गृहिणी आहे तर वडील महेश कोकरे हे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक आहेत.

SSC Result 2023 : दहावीच्या निकालात कुठल्या विभागानं बाजी मारली? मुली पुन्हा ठरल्या टॉपर
मनिषचे महेश कोकरे यांनी त्याला अनेक शाळाबाह्य परीक्षेलाही प्रोत्साहन दिले होते. त्यावेळीही मनिषने प्रत्येक स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळवले होते. आपल्या यशात शाळेतील सर्व शिक्षक आईवडिल यांचा सिंहाचा वाटा असून यापुढे नीट मध्ये यश मिळवून मेडिकल मध्ये करिअर करायचे आहे असे मनिषने सांगितले. कोकरे कुटुंबीय मूळचे सांगली येथील आहे नोकरीनिमित्त हे कुटुंब दापोली येथे गेले काही वर्षे स्थायिक आहे.

याच ज्ञानदीप विद्यालयातील जिज्ञासा राकेश मुके या विद्यार्थीनीने ९७.८०% गुण मिळवून शाळेत दिव्तीय क्रमांक मिळवला आहे. तसेच चेतन सुनिल तोटावार याने ९७.६०% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे. ज्ञानदीप विद्यामंदिर दापोलीचा २०१७ चा कोकण विभागीय मंडळ रत्नागिरी मध्ये १०० टक्के गुण प्राप्त करण्याची कु. ईशा प्रशांत शिवलकर हिची परंपरा कुमार मनिष महेश कोकरे याने १०० टक्के गुण मिळवून कायम ठेवली आहे.

एकाच घरात राहिले, एकत्रच अभ्यास केला, एक मार्क इकडे की तिकडे नाही, अगदी सेम टू सेम…!
या सर्व यशस्वी विदयार्थ्यांचे संस्था अध्यक्षा सरोज मेहता, संचालक सुजय मेहता, रितू मेहता,सुयश मेहता,सुयोग मेहता व सर्व संचालक, मुख्याध्यापक मधुकर मोरे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक महेश शिंदे व सर्व शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे.

Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here