विनित जांगळे, ठाणे : दहावीच्या निकालात अगदी शंभर टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चर्चा कानावर येतात. मात्र ठाण्यातील एका पठ्ठयाने सर्वच विषयात ३५ गुण मिळवले आहेत. त्याच्या या अनोख्या यशाचे कुटुंबियांना कौतुकच आहे. आमच्या मुलाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहणार असा, विश्वास त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आपल्या आई – वडिलांच्या कष्टाचे चीज करण्यासाठी मॅकेनिकल इंजिनिअर बनून त्यांची स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास ३५ टक्के मिळवत ‘काठावर पास’ झालेल्या विशाल कराड या विद्यार्थ्याने उराशी बाळगला आहे.

ठाण्याच्या उथळसर भागातील चाळीत दहा बाय दहाच्या खोलीत राहणारा विशाल कराड शिवाईनगर येथील शिवाई विद्यालयात शिकत होता. वडील अशोक कराड रिक्षा चालवून कुटुंबाचा चरितार्थ चालवतात. विशालच्या आई ज्योती कराड या अपंग असल्याने घरीच असतात. ही अशी घरची परिस्थिती बेताची असल्याने विशालने खूप शिकून मोठे बनण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे.

एकाच घरात राहिले, एकत्रच अभ्यास केला, एक मार्क इकडे की तिकडे नाही, अगदी सेम टू सेम…!
अवघे ३५ टक्के गुण मिळाले तरी प्रचंड मेहनत करून भविष्यात मॅकेनिकल इंजिनिअर बनणार असल्याचे त्याने सांगितले. दरम्यान, विशालला सर्वच विषयात मिळालेले ३५ गुण हे त्याचे इतर मुलांप्रमाणेच यश असून आम्ही आमच्या मुलाच्या यशात आनंदी आहोत, असे मत त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केले.

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील अंजनगाव येथील सोमेश्वर विद्यालयात शिकत असणाऱ्या सख्ख्या मावस भावंडांना दहावीच्या परीक्षेत समान गुण मिळाले आहेत. दोघांनाही एकूण गुणांपैकी ३०३ एवढे गुण मिळाले असून ६०.६० टक्के गुण मिळाले आहेत. अंजनगाव येथील आरती प्रशांत कुचेकर व तिचा मावसभाऊ कुणाल सकट अशी या भावंडांची नावे आहेत.

हलाखीच्या परिस्थितीत लढली, आता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं नेतृत्व; मेंढपाळाच्या लेकीची गरुड भरारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here