केरळ: केरळमधील कोट्टायम जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात राहणाऱ्या लोकांना गेल्या काही दिवसांपासून मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या गावातील जमिनीतून रहस्यमय आवाज ऐकू येत आहेत. कोट्टायमच्या चेनापडी गावातील रहिवाशांनी सांगितले की, त्यांना शुक्रवारी पहाटे दोनवेळा ही रहस्यमयी आवाज ऐकू आले. या आठवड्याच्या सुरुवातीलाही गावात आणि आजूबाजूला असेच काही आवाज ऐकू आले होते. हे आवाज का येत आहेत, त्यामागील कारण काय, याचा शोध घेण्यासाठी काही तज्ज्ञांचं पथक सध्या तपासात गुंतले आहे.
आजूबाजूच्या वातावरणात कोणताही बदल दिसून येत नसून जमिनीखालून असे आवाज येण्याचे कारण काय हे केवळ वैज्ञानिकच शोधू शकतात, असं ग्रामस्थांनी सांगितले. केरळ खाण आणि भूगर्भशास्त्र विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांची तज्ज्ञ टीम लवकरच या परिसराची तपासणी करेल.

या आठवड्याच्या सुरुवातीला जेव्हा आवाज ऐकू आला तेव्हा त्यांनी परिसराची पाहणी केली. पण, आज पुन्हा तसाच मोठा आवाज ऐकू आल्याच्या वृत्ताच्या आधारे आमचे तज्ज्ञ पुन्हा घटनास्थळाची तपासणी करतील, असे विभागातील सूत्राने सांगितले. पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली असे आवाज वारंवार येण्याचे खरे कारण तेव्हाच कळू शकेल जेव्हा सेंटर फॉर अर्थ सायन्सेस (सीईएस) यावर विस्तृत वैज्ञानिक अभ्यास करेल.
केंद्राकडे मदतीची विनंती
या प्रकारच्या घटनेचे विश्लेषण करण्याबाबत आम्हाला काही मर्यादा आहेत, त्यामुळे आम्ही सीईएसला या भागाला भेट देऊन तपास करण्याची विनंती केली असल्याचंही सूत्राने सांगितले. भूगर्भशास्त्र विभागातील तज्ज्ञ या परिसराची पुन्हा तपासणी करतील, असेही ते म्हणाले. त्यानंतरच या आवाजांमागील खरं कारण समजेल, असे त्यांनी सांगितले.