खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यावर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात जीवघेणा चाकूहल्ला झाला होता. हल्ला करणाऱ्या (रा. नायगाव पाडोळी, ता. कळंब) याला अटक केली होती. तो तुरुंगात होता. त्याने सोमवारी दुपारी तुरुंगातून पळ काढला होता. उस्मानाबाद शहराजवळच्या शिंगोली गावात एका मंदिरात तो लपून बसला होता. पोलिसांनी त्याच्या पुन्हा मुसक्या आवळल्या आहेत.
काय घडलं होतं?
खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर १६ ऑक्टोबर २०१९ रोजी उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारार्थ नायगाव पाडोळी येथे गेले होते. तेव्हा अजिंक्य टेकाळे याने ओमराजेंवर अचानक चाकूहल्ला केला. यामध्ये ओमराजे जखमी झाले. या प्रकरणी शिराढोण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होऊन नंतर अजिंक्य टेकाळेला अटकही झाली. तेव्हापासून तो कारागृहात होता. मात्र, १४ ऑगस्ट रोजी त्याची तब्येत बिघडल्याने त्यास जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर तुरुंगात रवानगी करण्यापूर्वी त्यास सोमवारी दुपारी करोना पार्श्वभूमीवर शासकीय डायट कॉलेज येथील सबजेलमध्ये दाखल करण्यासाठी पोलिस नाईक लक्ष्मण धोत्रीकर व अन्य एक पोलिस कर्मचारी घेऊन गेले. यावेळी सदरील सबजेलच्या गेटवरून अजिंक्य टेकाळेने पोलिसांना हिसका देऊन पळ काढला. पोलिसांनीही पाठलाग केला परंतु, पावसामुळे वाढलेल्या गवताने व झाडाझुडपाचा आसरा घेत आरोपी फरार झाला. या प्रकरणी आनंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Your site is very helpful. Many thanks for sharing!
Good one! Interesting article over here. It’s pretty worth enough for me.
Thanks so much for the blog post.
I really like and appreciate your blog post.
Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.