मुंबई: करोनाची लागण झाल्यामुळं सध्या होम क्वारंटाइन असलेले माजी खासदार यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यांनी नुकतंच एक ट्वीट केलं होतं. रोहित पवारांच्या या ट्वीटला नीलेश राणे यांनी तात्काळ उत्तर दिलं आहे.

नीलेश राणे यांनी स्वत:च्या चाचणी अहवालाबाबत रविवारी संध्याकाळी एक ट्वीट केलं होतं. ‘माझा कोविड-१९ रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्येत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्याने मी स्वतःला सेल्फ क्वारंटाईन करून घेतले आहे. माझ्या संपर्कात आलेल्या इतर सर्व व्यक्तींनीही स्वत:ची चाचणी करावी,’ असं आवाहन त्यांनी केलं होतं.

वाचा:

नीलेश राणे यांचं हे ट्वीट रोहित पवार यांनी रीट्वीट केलं होतं. ‘नीलेशजी लवकर बरे व्हा. सर्वांच्या सदिच्छा आपल्या पाठीशी आहेत,’ असं रोहित यांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं. त्यांच्या या सदिच्छांना नीलेश राणे यांनीही प्रतिसाद दिला आहे. ‘मी आपला आभारी आहे,’ असं म्हणत नीलेश यांनी रोहित पवारांचं ट्वीट रीट्वीट केलं आहे.

काही दिवसांपूर्वी रोहित पवार व नीलेश राणे यांच्यात ट्विटरयुद्ध रंगलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साखरेच्या प्रश्नावर पंतप्रधान मोदी यांना लिहिलेल्या पत्रावर नीलेश यांनी अप्रत्यक्ष टीका केली होती. साखर उद्योगाला आजवर झालेल्या मदतीचं ऑडिट करण्याची मागणी त्यांनी केली होती. रोहित पवार यांनी त्यांना खोचक शब्दांत उत्तर दिलं होतं. त्यानंतर नीलेश यांनी शेलक्या शब्दांत त्यांच्यावर टीका केली होती. कालांतरानं हा वाद थांबला होता. ताज्या ट्वीटमुळं ती कटुता दूर झाल्याचं मानलं जात आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here