मदतकार्य आणि बचावकार्यासाठी जिकडून शक्य तिकडून यंत्रणा आणली गेली आहे. या घटनेत ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या नातेवाइकांप्रती संवेदना असल्याचं अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केलं आहे. जखमींवर कटक आणि भुवनेश्वरमध्ये चांगल्या रुग्णालयात उपचार करण्यात येतील, असं अश्विनी वैष्णव म्हणाले.
रेल्वेकडून मदतनिधीची घोषणा करण्यात आली आहे. एक उच्च स्तरीय समिती या अपघाताच्या मुळाशी जाण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे. या घटनेच्या मुळापर्यंत जाऊन कारणांचा शोध घेतला जाईल, असं अश्विनी वैष्णव म्हणाले. आमचं संपूर्ण लक्ष हे बचावकार्यावर आहे, असं केंद्रीय मंत्र्यांनी म्हटलं. जे जखमी झाले आहेत त्यांच्यावर उपचार करण्यावर आणि त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सध्या सर्व लक्ष मदतकार्यावर आहे असं म्हटलं.
अपघाताच्या काळात मानवी संवेदना असणं आवश्यक आहे. मृतांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. जखमींना मदत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्याचं सध्याचं आव्हान आहे, असं वैष्णव म्हणाले.
सध्या मदतकार्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. मदतकार्याबाबत जिल्हा प्रशासनानं माहिती दिल्यानंतर आम्ही रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्याबाबत काम सुरु करु, यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा दाखल झाली आहे. सध्या जे जखमी झाले आहेत त्यांच्या बचावकार्य आणि उपचारावर असल्याचं अश्विनी वैष्णव म्हणाले. या प्रकरणी सखोल चौकशी केली जाईल. उच्च स्तरीय चौकशी समितीची स्थापना करण्यात आली आहे. रेल्वेची स्वतंत्र समिती असते, असं अश्विनी वैष्णव म्हणाले.
मृतांची संख्या सातत्यानं रेल्वे विभागाकडून आणि जिल्हा प्रशासनाकडून माहिती दिली जाईल, असं वैष्णव म्हणाले. सर्व लक्ष बचावकार्यवर आहे, असं त्यांनी सांगितलं. पूर्ण माहिती मिळाल्यावर यासंदर्भात भाष्य केलं जाईल, असं ते म्हणाले.