ओडिशातील बालासोरमध्ये कोरोमंडल एक्स्प्रेस, बंगळुरु हावडा एक्स्प्रेस आणि मालगाडीचा अपघात झाला. त्यानंतर शेकडो लोकं दुर्घटनास्थळी पोहोचली, तिथं बचाव कार्य सुरु केलं. त्याचप्रमाणं काही जण रुग्णालयात रक्तदान करण्यासाठी पोहोचले. काही तासांमध्ये ९०० यूनिट रक्त जमा झालं, तर, २००० हजार जणांनी नोदंणी केली होती.
रक्तदान करण्यासाठी गर्दी वाढत होती…
या अपघाताची माहिती मिळताच रात्री जवळपास दोन हजार युवक रक्तदान करण्यासाठी रांगेत उभे राहिले होते. रक्तदान करणाऱ्यांची गर्दी वाढत होती. काही तासांमध्ये बालासोरमध्ये सुरुवातीला ५०० यूनिट रक्त जमा झालं तर सकाळपर्यंत ९०० यूनिट रक्त जमा झालं होतं.
मेडिकल कॉलेजमध्ये तरुण शांततेत रांगेत उभे होते. रात्री १२ वाजता रांगेत उभे राहिलेले युवक सकाळपर्यंत रांगेत उभे होते. एखादा जखमी आल्यास तरुण त्यांना मदत करण्यासाठी धावत जात होते. पुन्हा येऊन रांगेत उभे राहत होते.
रक्तदानासाठी नोंदणी करण्यात आली
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार एखा वेळी मोठ्यासंख्येनं रक्त साठवता येणार नाही. त्यामुळं ९०० यूनिट रक्त जमा झाल्यानंतर रक्तदान थांबवण्यात आलं. त्यानंतर युवकांनी रक्तदानासाठी नोंदणी सुरु केली. २ हजार पेक्षा अधिक तरुणांनी रक्तदान केलं. कुणी न बोलावता युवक रक्तदानासाठी जमा झाले होते. युवकांच्या या कृतीनं भारतीय तरुणाईमध्ये अजून मानवता असल्याचं दिसून आलं.