Sangli Jat Yelavi Village Car Accident : एका कार अपघातात दोन मित्रांचा मृत्यू झाला आहे. तर तिसऱ्या मित्र जखमी झाला आहे. तिघेही जीवलग मित्र होते. पण दोन मित्रांनी अपघातात जीव गमवला आहे. तिघेही मित्र एकाच गावातील होते. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

मृत दगडू शंकर करंडे व सुखदेव खरात आणि जखमी बापू धोंडीबा हे तिघेही एकाच गावचे आणि तिघेही मुंबईत कंटेनर चालक म्हणून काम करत होते. तिघेही सुट्ट्या घेऊन आपल्या गावी आले होते. मृत दगडू करंडे यांच्या पत्नीवर जत येथील एका खासगी रुग्णालयामध्ये पोटावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आणि या ठिकाणी त्या उपचार घेत होत्या.
पत्नीला बघण्यासाठी गावी जात असल्याने दगडू करंडे यांनी आपल्या जीवलग मित्रांना देखील सोबत घेतले. आणि तिघेही शुक्रवारी सकाळी कारने जत येथे आले होते. दगडू करंडे यांनी आपल्या पत्नीची भेट घेतली. रुग्णालयामधून भेट झाल्यानंतर दगडू करंडे हे आपल्या मित्रांसोबत पुन्हा परत निघाले. मात्र तीन मित्रांपैकी दोन मित्र भीषण अपघातात ठार झाले आहेत. अपघाताच्या घटनेमुळे अभिसेवाडी गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेची नोंद जत पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे. अधिक तपास जत पोलीस करत आहेत.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.