मुलाखतीत वॉर्नर म्हणतो की, बोर्डाने माझ्या कर्णधारपद बंदी प्रकरण ज्या पद्धतीने हाताळले ते अपमानास्पद होते. बोर्डाने हे प्रकरण मिटवण्या ऐवजी अधिक खेचले, ही गोष्ट फार निराश करणारी होती. असं झाले नसले पाहिजे.
ऑस्ट्रेलिया क्रिकेटने २०१८ साली वॉर्नरवर नेतृत्व करण्यावर आजीवन बंदी घेतली होती. त्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्या कोड ऑफ कंडक्टमध्ये काही बदल केले होते. ज्यामुळे वॉर्नरने स्वत:वरील बंदी हटवण्यासाठी याचिका केली होती. मात्र बोर्डाने त्याच्या याचिकेवर अद्याप पूर्णपणे कोणताही निकाल दिलेला नाही.
वॉर्नर म्हणतो की, या संपूर्ण प्रकरणामुळे मला खेळावर लक्षकेंद्रीत करता येत नाहीय. कसोटी मॅच दरम्यान मला फोन येत असतात आणि माझे लक्ष खेळा ऐवजी वकिलांशी बोलण्याकडे जात आहे. हे माझ्यासाठी अपमानास्पद आहे आणि यामुळळे फार निराशा देखील आली.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे वॉर्नरने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात याचिका दाखल केली होती. त्यात त्याने कर्णधारपदावर लावण्यात आलेली बंदी हटवण्याची मागणी केली होती. माझा हेतू त्यांचा अपमान करण्याचा नाही. मी पॅनलकडे विनंती करतो की, माझी सुनावणी एका बंद खोलीत व्हावी. पण त्यांना ही सुनावणी सार्वजनिक स्वरुपात करायची आहे. हे अजिबात योग्य नाही.
काय आहे संपूर्ण प्रकरण
हे संपूर्ण प्रकरण २०१८ सालचे आहे जेव्हा ऑस्ट्रेलियाचा संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला होता. तेव्हा सॅड पेपर गेट कांड झाले होते. या घटनेत कॅमरून बॅनक्रॉफ्टला चेंडूवर काही तरी घासताना पाहिले गेले. नंतर असे लक्षात आले की तो बॉल टेंपरिंग करत होता आणि यात कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांचा देखील सहभाग होता. तेव्हा स्मिथ कर्णधार आणि वॉर्नर उपकर्णधार होता. या दोघांना पदावरून हटवण्यात आले आणि प्रत्येकी १ वर्षाची बंदी घालण्यात आली. तर बॅनक्रॉफ्टवर ९ महिन्यांची बंदी घालण्यात आली. या कारवाईत वॉर्नरला आजीवन नेतृत्व करण्यापासून रोखण्यात आले.