म. टा. प्रतिनिधी, मुंबई : ओडिशा राज्यात अत्यंत मोठी रेल्वे दुर्घटना घडली असून या दुर्घटनेत २०० हून अधिक नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. या घटनेनंतर देशभरात हळहळ व्यक्त केली जात असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वच महत्त्वाच्या नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. तसंच अनेक सरकारी कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात एसटी महामंडळानेही महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ‘ओडिशात घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे मुख्यमंत्र्यांनी आज, शनिवारी एसटी महामंडळाचे अमृतमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त आयोजित सर्व कार्यक्रम स्थगित केले आहेत,’ अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्याकडून देण्यात आली आहे.

देशातील सगळ्यात मोठ्या प्रवासी महामंडळ असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या लोकवाहिनीची गाथा सांगणाऱ्या एसटी विश्वरथाचे आज, शनिवारपासून मार्गक्रमण सुरू होणार आहे. एसटीच्या अमृतमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्ताने रथाची बांधणी करण्यात आलेली आहे. एसटी रथाचा नारळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत फुटणार होता.

Sameer Wankhede : समीर वानखेडेंना ट्विटरवरुन धमकी, क्रांती रेडकर म्हणाल्या यापूर्वी दुर्लक्ष केलं पण आता…

१ जून १९४८ रोजी एसटीची पहिली फेरी अहमदनगर-पुणे मार्गावर धावली. या घटनेला यंदा ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. एसटीच्या अमृतमहोत्सवी वर्धापन दिनाच्या निमित्ताने पंचकलमी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. नवनियुक्त एसटी सदिच्छा दूत ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. एसटीच्या पहिल्या गाडीपासून ते ई-शिवनेरी यांची प्रतिकृती, कालानुरूप झालेले बदल आणि सरकारकडून एसटीच्या माध्यमाने देण्यात येणाऱ्या योजनां यांची माहिती रथातून गावागावात देण्यात येणार आहे.

असे होते एसटीचे पंचकलमी कार्यक्रम

– २५ वर्षांपेक्षा जास्त काळ सुरक्षित सेवा बजावणाऱ्या पाच चालकांचा सपत्निक सत्कार

– करोनानंतर दर्जेदार कामगिरी करणाऱ्या राज्यातील तीन विभांगाचा व ९ आगारांचा सत्कार.

– दूरदर्शी प्रणालीद्वारे राज्यातील बसस्थानकांचे भूमिपूजन, उद्घाटन आणि बसस्थानक परिसराचे काँक्रिटिकरण.

– एसटी कॉफीटेबल पुस्तकाचे अनावरण

– एसटी विश्वरथाचे उद्घाटन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here