जालना : भरधाव येणाऱ्या ट्रेलरने दुचाकीला धडक दिल्याने एका नवविवाहित महिलेचा मृत्यू झाला आहे तर दोन जण जखमी झाले आहेत. पती पत्नी आणि मावस दिर हे प्रवास करत होते. जालना जिल्ह्याच्या धुळे-सोलापूर महामार्गांवरील वडीगोद्री टी पॉईटच्या उड्डाणपुलाजवळ २ जून रोजी दुपारी १२ च्या दरम्यान ही घटना घडली. या अपघातात आश्विनी अनिकेत कादगे वय २२ रा. रुई धानोरा ता.गेवराई या नवविवाहित महिलेचा मृत्यू झाला. तर, अनिकेत हनुमंत कादगे वय २८ रा. रुई धानोरा ता. गेवराई आणि प्रमोद नामदेव घाटे वय २२ हे जखमी झाले आहेत.

देऊळगावराजा येथील १ जून रोजीचं लग्न आवरून अनिकेत कादगे, अश्विनी कादगे आणि प्रमोद घाटे हे तिखे २ जून रोजी सकाळी दुचाकी क्रमांक एम एच २३ बी जी ६५२१ या दुचाकीवरून निघाले होते. अश्विनी,अनिकेत आणि प्रमोद हे तिघे रुई धानोरा येथे जात असताना छत्रपती संभाजीनगर कडून बीड कडे जाणाऱ्या भरधाव ट्रेलर क्रमांक जी जे ३६ एक्स ३३३३ ने धुळे -सोलापूर महामार्गांच्या वडीगोद्री टी पॉईंट जवळ दुचाकीला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की या धडकेत अश्विनी या जागीच ठार झाल्या तर अनिकेत व प्रमोद हे दोघे जखमी झाले आहेत.
Sameer Wankhede : समीर वानखेडेंना ट्विटरवरुन धमकी, क्रांती रेडकर म्हणाल्या यापूर्वी दुर्लक्ष केलं पण आता…
या अपघाताची माहिती मिळताच वडीगोद्री येथील गावाकऱ्यांनी अपघात स्थळावर धाव घेत मदत केली. काही गावकऱ्यांनी धडक देऊन पळून जाणाऱ्या ट्रकला पकडून चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेची माहिती कळताच महामार्ग ५२ चे मदतनीस यांच्याकडून अश्विनी यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून शव शवविच्छेदनासाठी वडीगोद्री प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला आहे. घटनेनंतर गोद्री पोलिसांनी ट्रक ट्रेलर ताब्यात घेऊन शहागड चौकी येथे नेला असून ट्रक ट्रेलर चालकासही ताब्यात घेण्यात आले आहे.
WTC फायनलच्या आधी डेव्हिड वॉर्नरची बंडखोरी; क्रिकेट ऑस्ट्रेलियामध्ये भूकंप, बोर्डाबद्दल…
वाहतूक पोलिसांनी यानंतर वाहतूक सुरळीत केली. वडीगोद्री प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मृत अश्विनी कादगे यांचा मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. लग्न होऊन जीवनाची स्वप्ने पाहणाऱ्या नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कागदे परिवारासह गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Odisha Railway Accident : ओडिशात भयंकर रेल्वे दुर्घटना; महाराष्ट्रात एसटी महामंडळानेही घेतला मोठा निर्णय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here