बीड : राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. पंकजा मुंडे यांच्या दोन दिवसांपूर्वीच्या वक्तव्याची जोरदार चर्चा झाली होती. त्यामुळे खडसे यांच्या भेटीनंतर पंकजा काय निर्णय घेणार याकडे मुंडे समर्थकांचे लक्ष लागले आहे.नुकतंच पंकजा मुंडे यांनी “मी पक्षाची आहे पण भाजप पक्ष माझा आहे का? असे म्हणत आपल्या नाराजीला वाट मोकळी करून दिली होती. भाजपत नाराज असलेल्या एकनाथ खडसेंनी कमळाची साथ सोडत दोन वर्षापूर्वी हातावर घड्याळ बांधले होते. यानंतर प्रथमच खडसे आणि मुंडे या नेत्यांमध्ये पहिल्यांदाच उघड भेट झाली आहे.

स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या नवव्या स्मृतिदिनाचे औचित्य साधत या नेत्यांमध्ये गोपीनाथ गडावर भेट झाली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती आङे. या पूर्वी १२ डिसेंबर २०१९ रोजी गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीदिनी एकनाथ खडसेंनी गोपीनाथगडावर हजेरी लावली होती. त्यावेळी झालेल्या भाषणात नाथाभाऊंनी स्वपक्षावर तोफ डागत पक्ष सोडण्याचे संकेत दिले होते. यावेळी नाथाभाऊंनी पंकजांनाही पक्षाबद्दल लवकर निर्णय घेण्याचा सल्लाही दिला होता. यानंतर पंकजांनी पक्षावर असलेली आपली नाराजी जाहीररित्या वारंवार उघड केली. मात्र तरीही राज्यातील भाजप नेतृत्वाकडून या नाराजीची दखल घेतली गेली नव्हती.

एकनाथ खडसेंनी भाजपला सोडचिट्ठी देत राष्ट्रवादीत जण पसंत केले. दुसरीकडे पंकजांनी भारतीय जनता पक्षात राहत आपल्या नाराजीची दखल घेतली जाईल या दृष्टीने प्रयत्न सुरु केले. मात्र, दोन दिवसांपूर्वी झालेल्या पंकजा मुंडे यांच्या भाषणानंतर नव्या चर्चांना सुरुवात झाली होती.
Bike Accident : नुकतंच लग्न झालेलं, पतीसोबत प्रवासासाठी निघाली पण अनर्थ.. ट्रेलरची धडक अन् नवविवाहिता ठार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेलेल्या खडसेंना पवारांनी विधानपरिषदेवर घेत मानाचं पानं दिलं. त्यामुळे नाथाभाऊंच्या माध्यमातून पक्षावर नाराज असलेल्या पंकजांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून जवळ करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. पंकजा मुंडे भाजपमध्येच थांबणार की नवा मार्ग स्वीकारणार हे आगामी काळात दिसून येऊ शकतं. एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांच्या भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं.

ओबीसी नेतृत्वाला डावलनं भाजपाला जड जाणार?

२०१४ च्या मोदी लाटेनंतर राज्यातील ओबीसी नेतृत्वाची स्पेस कमी झाली. त्यांनतर या नेत्यांचे पंख छाटण्याचे काम राज्यातील पक्षनेतृत्वाकडून झाल्याचं बोललं गेलं. यातूनच दुखावलेल्या खडसेंनी भाजपला रामराम ठोकला. आता तेच खडसे पंकजांना भेटल्याने पंकजा मुंडे देखील तोच कित्ता गिरवणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
Odisha Railway Accident : ओडिशात भयंकर रेल्वे दुर्घटना; महाराष्ट्रात एसटी महामंडळानेही घेतला मोठा निर्णय

पंकजा मुंडे काय म्हणाल्या ?

पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेंना अभिवादन करून हा दिवस माझ्यासाठी भावनिक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या गडावर मुंडे साहेबांवर प्रेम असणारा कोणीही येऊ शकतं असं म्हणत खडसेंच्या भेटीवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
अरेरे! १२ तासांपासून वडील मृतदेहांमधून वाट काढताहेत, लेकाला शोधताहेत; हृदयद्रावक कहाणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here