भुवनेश्वर : ओडिशा राज्यात तीन रेल्वे गाड्या एकमेकांना धडकल्याने भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता २३८ वर पोहोचला असून ९०० हून अधिक प्रवासी जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. मागील अनेक दशकांतील हा सर्वात मोठा रेल्वे अपघात असल्याचं सांगितलं जात आहे. या अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वच बड्या नेत्यांनी शोक व्यक्त केला असून देशवासीयही या घटनेनं हळहळत आहेत. मात्र हा अपघात टाळणं शक्य होतं का, शेकडो नागरिकांचे प्राण वाचवले जाऊ शकत होते का, असे प्रश्नही उपस्थित केले जात असून यासंदर्भात रेल्वेमंत्र्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लक्ष्य केलं जात आहे.
बंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस (१२८६४) बहानगा बाजार येथे रुळांवरून घसरल्याने या गाडीचे डबे रुळांवर पडले होते. हे डबे शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेसला (१२८४१) धडकले. त्यानंतर कोरोमंडल एक्स्प्रेसचे डबे दुसऱ्या एका मालगाडीला धडकले आणि ही भीषण दुर्घटना घडली. अपघाताचे ठिकाण हावड्यापासून २५५ किलोमीटरवर आहे. तीन रेल्वे गाड्या एकमेकांना धडकून झालेल्या या अपघातानंतर आता रेल्वेमंत्र्यांनी केलेल्या एका दाव्याबाबतचा जुना व्हिडिओ शेअर करत लोकांकडून प्रश्नांचा भडीमार केला जात आहे.

काय होता रेल्वेमंत्र्यांचा दावा?
दोन रेल्वे गाड्यांची धडक रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून एक यंत्रणा विकसित करण्यात आली होती. ही एक ऑटोमेटिक सुरक्षा प्रणाली असून ट्रेन कोलिशन अव्हॉयडन्स सिस्टम या नावाने २०१२ साली सुरू करण्यात आली होती. मोदी सरकारच्या काळात या यंत्रणेचं KAVACH असं नामकरण करण्यात आलं. तसंच रेल्वेमंत्र्यांकडून डिसेंबर २०२२ मध्ये १४५५ किमी अंतरावरील रेल्वे रुळावर ही यंत्रणा कार्यान्वयित करण्यात आली होती. मात्र भारतीय रेल्वेचा विस्तार पाहता हे अंतर खूपच कमी आहे. त्यामुळे आता ओडिशात घडलेल्या रेल्वे अपघातानंतर जर ही यंत्रणा पूर्ण ताकदीने आधीच सुरू करण्यात आली असती तर २०० हून अधिक नागरिकांचा जीव वाचवला आला असता, अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.
दरम्यान, या मुद्द्यावरून रेल्वे मंत्र्यांना टॅग करत नेटिझन्स आपला रोष व्यक्त करत आहेत.