Mumbai Crime : नांदेडमधील (Nanded) लोहा-कंधार मतदारसंघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे (Shyamsundar Shinde) यांच्या मुंबईतील राहत्या घरातून 25 लाखांची रोकड चोरी करुन त्यांच्याकडे 30 लाखांच्या खंडणी मागणाऱ्या चालक चक्रधर मोरे याला बेड्या ठोकत नांदेडमधून अटक केली आहे. विशेष म्हणजे आरोपी चक्रधर मोरे हा आमदार शिंदे यांच्याकडे चालक म्हणून नोकरी करत होता. 

आमदार शिंदे यांच्या ना. म. जोशी मार्ग येथील अपोलो मिल कम्पाउंडमध्ये असलेल्या लोढा बॅलोसिमो को-ऑप हौ. सोसायटीमधील 39 व्या मजल्यावर फ्लॅट आहे. दरम्यान याच फ्लॅटमध्ये चोरी झाल्याची घटना समोर आली होती. तर या घटनेत त्यांच्या घरातून 25 लाखांची रोकड चोरीला गेले होते. तर ही चोरी त्यांच्याच गाडीवर चालक म्हणून काम करणाऱ्या चक्रधर मोरे याने केली होती. चोरी केल्यावर मोरे हा नॉट रिचेबल झाला. विशेष म्हणजे काही दिवसांनी शिंदे यांना कॉल करुन मोरेने त्यांच्याकडे 30 लाख रुपयांची मागणी केली. त्यामुळे शिंदे यांनी एन एम जोशी पोलीस स्टेशनमध्ये (N M Joshi Police Station) याप्रकरणी तक्रार देऊन गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत आरोपी मोरेला नांदेडमधून ताब्यात घेतले आहेत. 

खंडणीचे पैसे पत्नीकडे देण्याची धमकी…

मोरे हा आमदार शिंदे यांचा चालक असल्याने तो त्यांच्या विश्वासू होता. त्यामुळे त्याचे घरात येणे-जाणे असायचे. दरम्यान हीच संधी साधून मोरे याने त्यांच्या घरातील 25 लाख रुपये चोरले. तसेच शिंदे यांना फोन करुन आणखी 30 लाखांची खंडणी मागितली. तर ही रक्कम 1 जूनपर्यंत त्याच्या पत्नीकडे न दिल्यास रायगडावर जाऊन स्वतःच्या जीवाला हानी पोहोचवून, सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी दिली. तर 1 एप्रिल ते 7 मे दरम्यान ही सर्व घटना घडल्याचे आमदार शिंदे यांचे स्वीय सहायक प्रमोद शिंदे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने मोरे हा शिंदे यांच्या गावाशेजारील गावातच असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, गुरुवारी त्याला अटक करण्यात आली.

कोण आहेत श्यामसुंदर शिंदे?

नांदेडमधील लोहा-कंधार मतदारसंघाचे (Loha Kandhar Constituency) श्यामसुंदर शिंदे हे आमदार आहेत. तर तर 2019 च्या निवडणुकीत शेकापतर्फे निवडून आलेले पक्षाचे विधानसभेतील एकमेव आमदार आहेत. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यावर सुरुवातीला त्यांनी भाजपचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समर्थन दिलं होतं. नंतर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून महाविकास आघाडीमध्ये प्रवेश केला. अडीच वर्षे महाविकास आघाडीसोबत राहिल्यानंतर त्यांनी आघाडीला देखील सोडचिठ्ठी देत भाजपशी घरोबा केला. 

news reels reels

इतर महत्वाच्या बातम्या: 

Mumbai Crime : मुंबईत आमदाराच्या घरात चोरी, चालकाने मित्राच्या मदतीने 25 लाख रुपये चोरले; 30 लाखांच्या खंडणीचीही मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here