स्थानिक लोकांच्या माहितीनुसार लागोपाठ धमाक्याचे आवाज येत होते. एकापाठोपाठ धमाक्याचे आवाज येत होते. यानंतर घटनास्थळी पाहिलं तर रेल्वेचे डबे रुळावरुन घसरली होती.
कोरोमंडल एक्स्प्रेस, बंगळुरु हावडा एक्स्प्रेस आणि मालगाडीच्या अपघाताबद्दल प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे. त्यानुसार कोरोमंडल एक्स्प्रेसचे कोच बी २ ते कोच ९ पलटले होते. तर ए १ आणि ए २ कोच ट्रॅकवर आडवे पडलेहोते. तर बी १ इंजिनसह रुळावरुन घसरलं होतं. कोच १ आणि जीएस कोच ट्रॅकवर होता. यामुळं मृतांमध्ये कोरोमंडल एक्स्प्रेसमधील मृतांची संख्या अधिक असू शकते.
बंगळुरु हावडा एक्स्प्रेसचं नुकसान
बंगळुरु हावडा एक्स्प्रेसचं १२८६४ देखील नुकसान झालं आहे. या एक्स्रप्रेसचा जनरलचा डबा दुर्घटनाग्रस्त झाला. तरस मागील बाजूनं जनरल सिटींग आणि दोन कोच रुळावरुन उतरले आणि पलटी झाले. कोच १ पासूनचे इंजिनपर्यंतचे इतर डबे रुळावर होते. या दुर्घटनेची चौकशी ए.एम. चौधरी (सीआरएस/एसई सर्कल) करणार आहेत. त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बेरहामपूर मधील पीयूष पोद्दार या अपघातातून बचावेल आहेत. ते कोरोमंडल एक्स्प्रेसमधून तामिळनाडूला निघाले होते. अपघाताबद्दल सांगताना ते म्हणतात की पहिल्यांदा आम्हाला धक्का बसला आणि आमचा डबा वळता दिसला. आमचा डबा रुळावरुन घसरत होता. आम्हाला एक धक्का बसला आणि आमच्यामधील काही जण डब्या बाहेर फेकलो गेलो. त्यावेळी आमच्या जवळपास चार ते पाच मृतदेह पडले होते, असं त्यांनी सांगितलं. तिथूनचं रांगत रांगत आम्ही बाहेर पडलो, असं पीयूष पोद्दार यांनी सांगितलं.