मुंबई : मुंबईला लागून असलेल्या मीरा भाईंदर परिसरात काल शुक्रवारी उत्तन समुद्रकिनाऱ्यावर एका प्रवासी बॅगेत महिलेचा शिर नसलेला मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे. पीडित महिलेची ओळख पटली आहे. मृत महिला नायगाव येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे.
महिलेच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिचा पती आणि पतीच्या भावाला अटक केली आहे. महिलेचा पती नट्टू सिंग आणि त्याचा भाऊ चुनचुन सिंग हे मूळचे नेपाळचे आहेत. या दोघांनाही पोलिसांनी अटक केली असून, आज पोलीस कोठडीसाठी न्यायालयात हजर करणार आहेत.

शुक्रवारी सकाळी मच्छीमार समुद्रकिनारी मासेमारी करण्यासाठी जात होते. त्याचवेळी त्यांना एक प्रवासी बॅग पाण्यात तरंगताना दिसली. ती बॅग पाहिल्यानंतर त्यांना थोडासा संशय आल्याचे मच्छिमारांनी पोलिसांना सांगितले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांनी बॅग उघडली असता त्यात एका महिलेचा शिर नसलेला मृतदेह आढळून आला. हे पाहून पोलिसही आश्चर्यचकित झाले.
सुरुवातीला या महिलेचे शिर नसल्यामुळे तिची ओळख पटवणे पोलिसांना अवघड झाले होते. मात्र, नंतर पोलिसांनी हत्येचं गूढ उकललं. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपींनी महिलेचे हात, पाय बांधून मृतदेह ट्रॅव्हल बॅगेत टाकला होता आणि नंतर बॅग फेकली होती.