नागपूर : देशात बलात्काराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. नागपूर शहर बलात्काराच्या एका घटनेने हादरले आहे. नागपुरातील वाठोडा पोलीस ठाण्यांतर्गत तीन वर्षांच्या चिमुरडीवर एका व्यक्तीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

नरेंद्र धनराज वांधरे (वय ४९ वर्ष) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे आई-वडील मजूर काम करत आहेत. ते कुटुंबासह भाड्याच्या घरात राहतात. त्यांची आर्थिक परिस्थितीही हलाखीची आहे.

रोज मंदिरात आरती करुन जायचे कामावर, पाईप लीकेज दुरुस्तीसाठी गेले, अन् अनर्थ घडला
नरेंद्र तिच्या आई-वडिलांना ओळखत असे आणि त्यांच्या घरी येत जात असे. गेल्या गुरुवारी मुलीचे आई-वडील कामावर गेले होते. तिथे असताना ती आजीसोबत घरात खेळत होती. दरम्यान, आरोपी तेथे आला आणि त्याने मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने सोबत नेले.

धक्कादायक! वडापाव आणायला गेलेल्या चिमुरडीवर अत्याचार; दुकानदाराला ठोकल्या बेड्या

आरोपीने मुलीला बाथरूममध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून घरमालक बाहेर आला. तिथे त्यांना आरोपी बाहेर निघताना दिसला. त्यानंतर त्यांनी ही माहिती मुलीच्या आई वडिलांना दिली. तिच्या आईने तिच्याकडे विचारपूस केली असता तिने आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला.

लग्नानंतर २० दिवसात बायकोचं अफेअर समजलं; ना खूनखराबा ना शोरशराबा, नवऱ्याचा मोठा निर्णय

यानंतर कुटुंबियांनी वाठोडा पोलिस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी नरेंद्रविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. महाराष्ट्राच्या उपराजधानीचे शहर महिला व मुलींसाठी अतिशय सुरक्षित शहर मानले जात होते, मात्र गेल्या काही वर्षांत येथे गुन्हेगारीत वाढ होताना दिसून येत आहेत. शहरातील निम्म्या लोकसंख्येशी संबंधित गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here