शिरूर, पुणे : कधी कुणावर कशी वेळ येईल सांगता येत नाही. शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई येथील प्रगती किसन कोरडे या दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा काही दिवसांपूर्वी अपघातात मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी तिने दहावीची परीक्षा दिलेली होती. फक्त शेवटचा भूगोलाचा पेपर बाकी होता. मात्र त्या आधी तिचा मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूने आई वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. पण काल दहावीचा निकाल लागला आणि शिक्षकांनी प्रगती पास झाल्याची माहिती देताच तिच्या आई वडिलांनी हंबरडा फोडला.

शिरूर तालुक्यातील कान्हूर येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात १० वीच्या वर्गात शिकणारी प्रगती किसन गोरडे (रा. फलकेवाडी) ही एक गुणी विद्यार्थिनी होती. तिचे आई-वडील शेतमजुरी करणारे असल्याने आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक होती. साधे सरळ जीवन जगणारे गोरडे कुंटुंबीय. गोरडे दाम्पत्याला तीनही मुली, मुलगा नाही. गरिबी असूनही हसतखेळत प्रपंचाचा गाडा ओढणारे हे कुटुंब. मुलींमध्ये प्रगती सर्वात थोरली असल्याने तिच्यावर सारी भिस्त होती. प्रगतीला खूप शिकवायचं आणि तिला नर्स करायचं आहे, असं तिचे वडील पालकसभेला आले की शिक्षकांना सांगायचे. सर्व शिक्षकांनाही गरीब परिस्थितीची जाणीव असल्याने तिला मदतीचा हात पुढे केला. प्रगतीला दहावीच्या परीक्षेत ७४.४० टक्के गुण मिळाले.

आठवड्यातून एक-दोन तास शाळा, घर, काम आणि नातवंडांना सांभाळून ५९ व्या वर्षी दहावीत उत्तीर्ण

पण नियतीच्या मनात काही वेगळेच होतं. अभ्यास करून पास व्हायचे ह्या निर्धाराने व आपल्या गरीब आईवडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून प्रगतीने अभ्यास केला आणि परीक्षा दिली. भूगोल विषयाचा पेपर बाकी होता. घरात खेळताना अपघात झाला आणि प्रगतीचा त्यात मृत्यू झाला. तिच्या मृत्यने आई वडील हबकून गेले आहेत. मात्र, परिसरातील ग्रामस्थांनी त्यांना धीर दिला. जिच्याबद्दल काही स्वप्न पाहिली होती,ती सारी धुळीला मिळाली होती. कारण प्रगती चांगल्या मार्क्सने पास होऊनही त्याचा आता काही उपयोग नाही. शिक्षकांनी प्रगतीचा निकाल पालकांना सांगताच “पण तो निकाल बघायला आमची प्रगती कुठे आहे सर, ती तर कधीच देवा घरी गेली” असे म्हणत तिच्या आई वडिलांनी हंबरडा फोडला.

हलाखीच्या परिस्थितीत लढली, आता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं नेतृत्व; मेंढपाळाच्या लेकीची गरुड भरारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here