लखनऊ: उत्तर प्रदेशच्या मिर्झापूर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पतीसोबत फोनवर वादावादी झाल्यानंतर संतापलेल्या पत्नीनं स्वत:च्या निष्पाप मुलांना विहिरीत फेकलं. त्यानंतर तिनं स्वत:ला पेटवून घेतलं. तिचा आरडाओरडा ऐकून कुटुंबीय पोहोचले. त्यांनी आग विझवली. तीन मुलांना विहिरीत टाकल्याचं तिनं आग विझल्यानंतर कुटुंबियांना सांगितलं. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तिन्ही मुलांचे मृतदेह विहिरीतून काढले. महिलेला ताब्यात घेण्यात आलं असून पोलिसांकडून तिची चौकशी सुरू आहे.मिर्झापूरच्या संतनगरमधील पजरा गावात शुक्रवारी ही घटना घडली. गावात राहणाऱ्या सुधाचा तिचा पती अमरजीतसोबत वाद झाला. अमरजीत कामासाठी मुंबईत वास्तव्यास असतो. फोनवर दोघांचं भांडण झालं. वाद टोकाला गेला. त्यानंतर सुधानं तिच्या तीन मुलांना (आकाश, कृती आणि अन्न) विहिरीत फेकलं. यानंतर सुधा घरात गेली. तिनं दार आतून लावून घेत स्वत:ला पेटवलं. आगीच्या ज्वाळा आणि सुधाचा आरडाओरडा ऐकून कुटुंबीय आणि शेजारी धावले. त्यांनी आग आटोक्यात आणली. त्यामुळे सुधाचा जीव वाचला. अरेरे! १२ तासांपासून वडील मृतदेहांमधून वाट काढताहेत, लेकाला शोधताहेत; हृदयद्रावक कहाणी आग विझल्यानंतर कुटुंबियांनी मुलांचा शोध घेतला. मात्र मुलं घरात नव्हती. मुलांना विहिरीत फेकल्याचं सुधानं कुटुंबियांना सांगितलं. त्यानंतर कुटुंबीय विहिरीच्या दिशेनं धावले. त्यावेळी त्यांना कृती आणि अन्नूचे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले. ग्रामस्थांच्या मदतीनं कुटुंबीय, नातेवाईकांनी दोघांचे मृतदेह बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच पोलीस पोहोचले आणि त्यांनी आकाशचा मृतदेह बाहेर काढला. भीषण अपघातात २८८ जणांचा मृत्यू; जबाबदार कोण? रेल्वेच्या रिपोर्टमधून धक्कादायक कारण उघडकीस सुधा यांचे सासरे श्यामधर यांनी रात्रीच्या सुमारास घडलेला घटनाक्रम कथन केला. ‘रात्री जेवल्यानंतर आम्ही झोपायला गेलो. मुलगा अमरजीत मुंबईत असतो. दोन महिन्यांपू्र्वी तो मुंबईला कामासाठी गेला. रात्री उशिरा त्याचं सूनेसोबत फोनवर बोलणं झालं. त्यांच्यात काय संवाद याची कल्पना नाही. मात्र त्यानंतर सुनेनं टोकाचं पाऊल उचललं,’ असं श्यामधर यांनी सांगितलं.
कौटुंबिक वादानंतर महिलेनं तीन निष्पाप मुलांना विहिरीत फेकल्याची माहिती पोलीस अधीक्षक ओ. पी. सिंह यांनी दिली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पोहोचले. त्यांनी एका मुलाचा मृतदेह बाहेर काढला. महिलेला ताब्यात घेऊन तिची चौकशी सुरू आहे, असं सिंह यांनी सांगितलं.