नवी दिल्ली : ओडिशाच्या बालासोर येथे शालीमार-चेन्नई कोरोमंडल एक्सप्रेस आणि बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्सप्रेसचा शुक्रवारी भीषण अपघात झाला. एकाच वेळी दोन एक्स्प्रेस गाड्या आणि मालवाहू ट्रेनची टक्कर झाली. ओडिशातील या भीषण अपघातात २८८ जणांचा मृत्यू झाला, तर ९०० हून अधिक प्रवासी जखमी झाले. तसेच मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना रेल्वेने १० लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे, पण तुम्हाला माहिती आहे का की तुमचे ट्रेन तिकीट तुम्हाला १ रुपयांपेक्षा कमी किमतीत १० लाख रुपयांपर्यंतचा विमा देते?

१ रुपयांपेक्षा कमी किमतीत १० लाखांपर्यंतचा विमा
ऑनलाइन रेल्वे तिकीट बुकिंगवर प्रवाशांना १० लाख रुपयांचा विम्याचा फायदा मिळतो. तुम्ही IRCTC वरून ऑनलाइन तिकीट बुक करताना तुम्हाला १ रुपयापेक्षा कमी किमतीत ट्रेन प्रवास विम्याचा पर्याय मिळतो. हा विमा मिळवण्यासाठी तुम्हाला तिकीट बुक करताना विम्याचा पर्याय निवडावा लागेल. जर तुम्ही विमा पर्याय निवडला तरच तुम्ही हा विमा घेण्यास पात्र ठरता.

Odisha Train Accident: भारतीय रेल्वेचं ‘कवच’ नेमकं आहे तरी काय? वाचले असले शेकडो प्राण
रेल्वे तिकिटावर मिळणार विमा आवश्यक का?
ऑनलाईन रेल्वे तिकीट बुक करताना जर तुम्ही विम्याचा पर्याय निवडला तर तुम्हाला प्रवासादरम्यान १० लाखांपर्यंत विमा सुरक्षा मिळते. याचा फायदा म्हणजे जर ट्रेनचा अपघात झाल्यास वैद्यकीय खर्च आणि मृत्यू झाल्यास आश्रितांना भरपाई देण्यासाठी आर्थिक सहाय्य कव्हर मिळते.

सुरक्षा कवच शिवाय धावली ट्रेन! ओडिशातील भयावह रेल्वे दुर्घटनेतील धक्कादायक अपडेट समोर
या विमा संरक्षण अंतर्गत जर एखाद्या प्रवाशाचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला किंवा तो कायमचा अपंग झाला, तर त्याला किंवा त्याच्या कुटुंबाला १० लाख रुपयांपर्यंतची विमा रक्कम दिली जाते. याशिवाय प्रवासी अंशतः अपंग झाल्यास त्याला ७.५ लाख रुपये नुकसान भरपाई मिळते. तर गंभीर दुखापत झाल्यास प्रवाशाला २ लाख रुपयांची मदतआणि अपघातात किरकोळ जखमी झाल्यास प्रवाशाला १०,००० रुपयांपर्यंत भरपाई मिळते.

Coromandel Express: रेल्वे दुर्घटनेने प्रशासनाचे दाबे दणाणले; सुरक्षेची पोलखोल, रुळात गडबड आणि सुरक्षा ‘कवच’ फेल
रेल्वे तिकिटावर विमा कसे मिळते?
जर तुम्ही येत्या काही काळात रेल्वेने प्रवास करणार असाल तर IRCTC ची वेबसाईट किंवा ॲपवर जाऊन तिकीट बुक केल्यास तुम्हाला १ रुपयात विम्याचा पर्याय मिळतो. पण लक्षात घ्या की सुविधा फक्त भारतीय प्रवाशांसाठी आहे. तिकीट बुक करताना तळाशी असलेला विम्याचा पर्याय निवडणे आवश्यक आहे. एसबीआय जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन लिमिटेड आणि लिबर्टी जनरल इन्शुरन्स लिमिटेड भारतीय रेल्वेच्या वतीने हा प्रवास विमा प्रदान करत आहेत.

ओडिशामध्ये कोरोमंडल रेल्वेचा भीषण अपघात, २०० प्रवाशांनी जीव गमावला तर ९०० हून अधिकजण जखमी

विमा दावा कसा करू शकतो
या विम्याचा दावा करण्यासाठी तुम्हाला ४ महिन्यांपर्यंतचा कालावधी मिळेल.ज्या विमाकंपनीच्या तिकिटावर तुम्हाला विमा मिळाला आहे, त्या विमा कंपनीच्या कार्यालयात जाऊन तुम्ही विम्याच्या दाव्यासाठी अर्ज करू शकता.सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे विमा निवडल्यानंतरतुम्ही नॉमिनीचे नाव भरले पाहिजे. नामनिर्देशन भरल्यानेदावा प्रक्रिया सुलभ होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here