सोलापूर : शरद पवारांनी पंढरपूरच्या दौऱ्यात भाकरी फिरवली.अभिजीत पाटलांच्या हातात घड्याळ बांधलं आणि तिथंच त्यांचं तिकीटही जाहीर केलं. पाटलांच्या राष्ट्रवादीतील एंट्रीनंतर सगळ्यांच्याच नजरा उंचावल्या आणि पुन्हा चर्चेत आले ते राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके. या सगळ्या घडामोडींनंतर भगीरथ भालकेंनी आधी पवारांची मग काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची भेट घेऊन बंद दाराआड चर्चा केली. भगीरथ भालके काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा झाल्या पण सगळ्यातून काही बाहेर येत नाही तोच आता पंढरपुरात नवं समीकरणं जुळण्याची शक्यता निर्माण झालीये आणि त्याचं कारण ठरलंय भालकेंना आलेली एका पक्षाची ऑफर…

शरद पवारांचं मन जिंकत अभिजीत पाटलांनी विधानसभेसाठी गावागावात फिल्डिंग लावलीये पण या सगळ्यानंतर भगीरथ भालके प्रचंड नाराज झालेत. पवारांनी सोलापुरात बोलावून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या सगळ्यानंतरही भारत राष्ट्र समितीचे प्रमुख तसेच तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी डाव साधलाय. कारण त्यांच्या कार्यालयातून भगीरथ भालकेंनाच थेट बीआरएस पक्षप्रवेशासाठी ऑफर आल्याची माहिती आहे.

पार्थ पवारांच्या पराभवाचं शल्य कायम, मावळमधून बारणेंना राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची लेक भिडणार?

  • पवारांच्या दौऱ्यानंतर आठवड्याभरातच भगीरथ भालकेंना बीआरएस पक्षाकडून फोन आल्याची माहिती
  • विधानसभेच्या उमेदवारीसह पक्षाची आणखी काही जबाबदारी देण्याचा भालकेंना शब्द दिल्याची माहिती
  • भालकेंना पक्षात घेण्यासाठी राव यांची कन्या तसेच निकटवर्तीय आमदार कामाला

मनोमिलनाची बैठक अटींनी गाजली, अभिजीत पाटलांची तडकाफडकी एक्झिट चर्चेचा विषय ठरली!

पंढरपूरकरांनी आपल्यालाच मतरुपी आशीर्वाद द्यावेत, यासाठी अभिजीत पाटलांनी गावागाव सभांचा धडाका लावलाय. अशातच निवडणुकीच्या तोंडावर भालकेंना आलेल्या ऑफरमुळे राष्ट्रवादीला मोठा हादरा बसण्याची शक्यता नाकारता येत नाही…

  • पंढरपूर मतदारसंघात सध्या भाजपचा आमदार
  • पंढरपूरपेक्षा मंगळवेढ्यात भालके यांना मानणारे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात
  • भालके नावाचा करिश्मा या मतदारसंघात चालू शकतो
  • दिवंगत नेते भारत भालकेंनी तीन निवडणुका वेगवेगळ्या पक्षाकडून लढून जिंकून दाखवले होते
  • भालकेंबरोबर कल्याणराव काळे, औदुंबरअण्णा पाटील विठ्ठल परिवारातील नेतेमंडळी नाराज
  • भालकेंच्या ऑफरच्या निर्णयानंतर ही नेतेमंडळी देखील भालकेंनी साथ देऊ शकतात
  • त्यामुळे पंढरपुरात नवसंजीवनी भेटलेल्या राष्ट्रवादीला भालकेच आव्हान ठरण्याची शक्यता

वरातीत नाचण्यावरून दोन गटात वाद, दलित तरुणाची हत्या, ॲट्रॉसिटीचा दणका, ७ जण जेलमध्ये
त्यामुळे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी समजूत घालल्यानंतरही भालके काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. सध्या तरी भालके ‘वेट ॲंड वॉच’च्या भूमिकेत असल्याची त्यांच्या निकटवर्तीयांची माहिती आहे. भालकेंनी बीआरएसमध्ये प्रवेश केल्यास ते अभिजीत पाटलांना आव्हान देऊ शकतात का? याच्या चर्चा आता पंढरपूर मतदारसंघात रंगल्यात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here