पुणे : पुणे शहरातील कोंढवा परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शाळेत सुरू असलेल्या समुपदेशन कार्यक्रमातून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात या प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १७ वर्षीय पीडित मुलीने या प्रकरणी तक्रार दिली आहे. हा प्रकार घडला तेव्हा पीडित मुलगी १३ वर्षाची असून सातवीच्या वर्गात शिकत होती

या प्रकरणी, मुन्ना नदाफ याच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २०१८ ते २०१९ दरम्यान घडला आहे. आरोपींविरोधात भा.द.वी. ३७६. ३७६ ड, ३७६ अ ब, ३४२ सह पोक्सो ऍक्ट कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भीषण अपघातात २८८ जणांचा मृत्यू; जबाबदार कोण? रेल्वेच्या रिपोर्टमधून धक्कादायक कारण उघडकीस
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. तिच्या शाळेत समुपदेशनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमादरम्यान शाळेतील महिला शिक्षिका विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना पीडित मुलीने ही आपबिती त्यांना सांगितली. आरोपी आणि पीडित मुलगी हे एकाच परिसरात राहत असून ते एकमेकांच्या परिचयाचे देखील आहेत. २०१८ ते २०१९ या कालावधीत पीडित मुलगी घराशेजारील गल्लीत खेळत होती.

यावेळी एका घराच्या खिडकीतून काहीतरी वस्तू खाली पडली. पडलेली वस्तू देण्यासाठी फिर्यादी घरात गेली असता घरात असणाऱ्या आरोपींनी पीडित मुलीला घरात ओढून घेऊन आतून कडी लावून घेतली. त्यानंतर या मुलीचा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून मोठ्या आवाजात म्युझिक लावून तिच्यावर तीनही आरोपींनी आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. “या संपूर्ण कृत्याविषयी कुणाला काही सांगितल्यास तुझे आणि घरच्यांचे हाल करेन”, अशी धमकी देखील दिली. हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर कोंढवा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला अटक केली आहे. इतर दोन आरोपींचा शोध सुरू आहे.

महिला कुस्तीपटूंसाठी भारताची चॅम्पियन टीम मैदानात; पत्रक काढत दिला पाठिंबा, कपिल देव म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here