भुवनेश्वर: ओडिशा रेल्वे अपघातावर माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांनी शंका व्यक्त केली आहे. ही दुर्घटना नसून कट असू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. या संपूर्ण घटनेची गांभीर्याने चौकशी झाली पाहिजे, अशीही मागणी त्यांनी केली आहे. दिनेश त्रिवेदी म्हणाले की, या घटनेची वेळ विचित्र आहे. या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी होऊन या प्रकरणाचं विश्लेषण व्हायला हवं. हा एक भीषण अपघात आहे.

समोर जे दृश्य आहे ते अत्यंत भयानक आहे. जसाकी येथे भूकंप आला आहे, असं वाटत आहे. जपानप्रमाणे एकही मृत्यू होऊ नये, हेच आपलं ध्येय असलं पाहिजे. नवीन तंत्रज्ञान येत आहे, ज्याचा रेल्वे व्यवस्थेत समावेश केला जात आहे.

भीषण अपघातात २८८ जणांचा मृत्यू; जबाबदार कोण? रेल्वेच्या रिपोर्टमधून धक्कादायक कारण उघडकीस
२०१० मध्ये कोलकाता येथे मोठा रेल्वे अपघात झाला होता. या अपघातानंतर दहा वर्षे तेथे गाड्या धावल्या नाहीत. या घटनेत एक मालगाडी गीतांजली एक्स्प्रेसवर चढली होती, ज्यात सुमारे १५०-१८० लोकांचा मृत्यू झाला होता. २०१० च्या चौकशी आयोगाने ही घटना एक मोठी शोकांतिका म्हणून नोंदवली होती.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही या प्रकरणावर वक्तव्य केलं आहे. ओडिशातील बालासोर येथे झालेला भीषण रेल्वे अपघात हा या शतकातील सर्वात मोठा रेल्वे अपघात आहे. त्यामागे काहीतरी कारण असावे. सत्य बाहेर आलेच पाहिजे. रेल्वे गाड्यांची धडक रोखण्यासाठी असलेल्या यंत्रणेने काम का केलं नाही, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी या प्रकरणी शंका व्यक्त केली आहे.

‘माणुसकीचा झरा’; रेल्वे अपघातानंतर रक्तदानासाठी लोकांची रांग

या अपघातात आतापर्यंत २८८ जणांचा मृत्यू

ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातात आतापर्यंत २८८ जणांचा मृत्यू झाला आहे तर ९०० जण जखमी असल्याची माहिती आहे. हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. लष्कर, हवाई दलासह अनेक पथके बचाव कार्यात गुंतलेली आहेत. अजूनही अनेक लोक रेल्वेच्या डब्यांमध्ये अडकल्याचं बोललं जात आहे. रेल्वेच्या डब्यांमध्ये खाण्यापिण्याचे पदार्थ, पाण्याच्या बाटल्या, चप्पल-चपला आदी सामान विखुरलेले दिसत आहे. बचावकार्यात लष्करही सहभागी झाले आहे. मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here