सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथून एक भयंकर घटना समोर आली आहे. भावासोबत झालेल्या जुन्या भांडणाच्या कारणावरून एकाने लहान भावासमोर एका तरुणाच्या पोटावर अन् छातीवर चाकूने वार करत हत्या केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

ही घटना माळीवाडा गल्ली बेगमपुरा येथे रात्री एक वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी मयताच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून बेगमपुरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विशाल कैलास शिंदे (वय २५, रा. माळीवाडा गल्ली, हनुमान मंदिराच्या पाठीमागे, बेगमपुरा) असं मयत तरुणाचं नाव आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar Mdnight Murder Of Youth CCTV Footage

संभाजीनगर तरुणाची हत्या सीसीटीव्ही फुटेज

बाबांच्या दहाव्याला वटपौर्णिमा होती, त्यांना अग्नी दिलेल्या ठिकाणी… पंकजांनी सांगितली हृदयस्पर्शी आठवण
गणेश पटारे (रा. बेगमपुरा) असं आरोपीचं नाव आहे. विशाल हा कुटुंबीयांसोबत बेगमपुरा परिसरामध्ये राहतो. त्याच्या कुटुंबामध्ये आजी, आई आणि लहान भाऊ असा परिवार आहे. विशाल आणि त्याची आई बीबीका मकबरा येथे कामावर आहे. दरम्यान, तीन महिन्यांपूर्वी विशाल आणि योगेश सूर्यकांत पटारे यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादानंतर बेगमपुरा पोलीस ठाण्यामध्ये विशाल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरण न्यायालयात सुरू आहे.

दरम्यान, काल शुक्रवारी रात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास योगेश पटारेचा भाऊ गणेश पटारे हा माळीवाडा गल्लीमध्ये आला आणि काही एक न विचारता त्याने विशालला चाकूने भोसकायला सुरुवात केली. छातीत आणि पोटात वार करून विशालला गंभीर जखमी केलं. ही बाब विशालच्या भावाच्या लक्षात येताच तो धावत आला. तो गणेशाला विनवणी करत होता. मात्र, गणेश ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने विशालला बेदम मारहाण करून गंभीर जखमी केलं होतं.

दरम्यान, घटनास्थळावरुन आरोपी गणेश हा फरार झाला. त्यानंतर शेजारच्यांच्या मदतीने विशालला तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यामध्ये मयत विशालच्या भावाच्या तक्रारीवरून गणेशच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून बेगमपुरा पोलीस आरोपी गणेशचा शोध घेत आहेत.

८३ ची वर्ल्डकप विजेती टीम कुस्तीगीरांच्या पाठिशी, कपिल देव म्हणाले, त्या दृश्यांनी व्यथित…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here