धाराशिव : परांडा शहराजवळ आज सकाळी एसटी बसला अपघात होऊन ७ प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. तर २३ प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना परांडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलय. ही बस उलटल्याने हा अपघात झाला.

या बाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, परांडा आगाराची एमएच २० बीएल २१९२ क्रमांकाची परांडा – बार्शी धाराशिव ही बस सकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास उलटल्याची घटना घडली आहे. या अपघातात ४३ प्रवासी प्रवास करीत होते. परांडा शहरापासून ४ किलोमीटक अंतरावर असलेल्या परांडा बार्शी – रोडवरील सोनगिरी येथील उल्फा नदीवरील पुलाजवळील वळणावर हा अपघात झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परांडा आगाराची परंडा – बार्शी – उस्मानाबाद ही बस सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास बसस्थानकातून सुटली होती.

पाइपलाइनमध्ये राहिला, सिग्नलवर गजरे विकले, रस्त्यावरील दिव्याखाली अभ्यास केला, किरणची दहावीत चमकदार कामगिरी
परांडा शहरापासून ४ कि.मी. अंतरावर परंडा बार्शी रोडवरील सोनगिरी – पुलाजवळील वळणावर ७ वाजून ४० मिनिटांनी बस उलटली व हा अपघात झाल्याची माहिती प्रवाशांनी नागरिकांना दिली. बस मधील ४३ पैकी एकूण ७ प्रवाशांना फ्रॅक्चर झाले असून १३ प्रवाशांच्या डोक्याला मार लागला आहे. तर या अपघातात २३ प्रवासी जखमी झाले आहेत.

तटरक्षक दलाची मोठी कामगिरी; अथांग समुद्रातून बाहेर काढले २० कोटी रुपये किमतीचे सोने, वाचा काय आहे प्रकरण
बार्शी बाजूकडून एक कंटेनर येत असताना समोरूनच एक जीप त्या कंटनेरला ओव्हरटेक करीत बसच्या अंगावर समोर आली. या वेळी बस चालकाने धडक टाळण्यासाठी, बचाव करण्यासाठी बस रस्त्याच्या कडेला घेतली असता ती घसरून रस्त्याच्या बाजूला कोसळली.

दरम्यान, चालकाच्या प्रसंगावधानाने व बसचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली. घनटनेची माहिती मिळताच शेजारील लोकांनी प्रवाश्यांना बाहेर काढण्यास मदत केली. तसेच जखमींवर परांडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

भंडाऱ्यात अनोखा विवाहसोहळा; नवरीची धमाकेदार एन्ट्री, संविधानाची शपथ घेऊन बांधली लग्नगाठ, सर्वत्र होतंय कौतुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here