सुरुवातीला करोनापासून बऱ्यापैकी मुक्त असलेल्या जिल्ह्यात बाधितांची संख्या आता १५ हजारच्या पुढं गेली आहे. तर, मृतांचा आकडा ४०० च्या जवळ पोहोचला आहे. त्यामुळं चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर ऋतुराज पाटील यांनी लोकांना काळजी घेण्याचं आवाहन करणारा व्हिडिओ शेअर केला आहे. स्वत:च करोना योद्धे व्हा, असं आवाहन त्यांनी जनतेला केलं आहे.
वाचा:
व्हिडिओमध्ये ते म्हणतात, ‘करोनामुळं संपूर्ण जग हादरून गेलोय. गेले पाच महिने आपण सगळे या संकटाचा सामना करतोय. आधी परदेशात, मुंबई, पुण्यात असलेला करोना आपल्या शहरात, गावात, दारात पोहोचलाय. डॉक्टर, पोलीस, काही एनजीओ आपलं काम करताहेत. पण सध्या समूह संसर्ग सुरू झाल्यासारखी स्थिती आहे. लोक बरे होताहेत, पण बाधितांची संख्या वाढतेय. त्यामुळं आपण स्वत:बरोबर इतरांची काळजी घेण्याची गरज आहे. स्वत:च करोना योद्धा व्हायचं आहे. पण तसं होताना दिसत नाही. आजही अनेक ठिकाणी गर्दी होतेय. आपण अनेक नियम पाळत नाही. लग्न, वाढदिवसाचे सेलिब्रेशन सुरू आहे. गाड्या रस्त्यावर आणून फिरवल्या जाताहेत. दुकानात गर्दी होतेय. कट्ट्यावरच्या, टपरीवरच्या गप्पा सुरूच आहेत. ऑफिसमध्ये पूर्वीसारखं वातावरण दिसू लागलंय. आपल्याला वाटतं त्याला काय हुतंय. पण हे वागणं योग्य नाही. हे सगळं थांबवता येणार नाही का? थोडं थांबू शकत नाही का? काही गोष्टी टाळता येणार नाहीत का? करोना गेल्यावर हे सगळं करता येणार आहे. पण आता जिवावर बेतू लागलंय. काळ कठीण आहे. म्हणून स्वत:ची, कुटुंबांची काळजी घ्या. सगळे नियम पाळा,’ असं आवाहन त्यांनी केलंय.
‘हे कोल्हापूर आहे. एकदा ठरलं की ठरलं! आमचा ठरलंय, करोनाला तटवायचं,’ अशी खास शैलीतील सादही त्यांनी कोल्हापूरकरांना घातलीय.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
I used to be able to find good info from your blog posts.
I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.
I like the valuable information you provide in your articles.
These are actually great ideas in concerning blogging.
Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.