शाहबाज हा बस वाहक म्हणून काम करायचा. यादरम्यान त्याची कोरबा येथील सीएसईबी पोलीस स्टेशन हद्दीतील पंप कॉलनीत राहणाऱ्या नीलम कुसुमशी मैत्री झाली. शाहबाज नोकरीसाठी गुजरातला गेला होता. यादरम्यान, कुसुम आणि शाहबाज यांच्यात दुरावा निर्माण झाला. काही काळाने या दोघांमध्ये पुन्हा संवाद सुरु झाला. काही काळाने शाहबाजला कुसुमवर शंका येऊ लागली.
गेल्या वर्षी ख्रिसमसच्या एक दिवसापूर्वी शाहबाज गुजरातहून कोरब्याला आला. मग तो थेट कुसुमच्या घरी पोहोचला. तिथे नाताळची तयारी सुरू होती. त्यावेळी घरात कोणीच नव्हते. कुसुम आणि शाहबाज यांच्यात काही कारणावरुन वाद झाला. त्यानंतर शाहबाजने कुसुमवर स्क्रू ड्रायव्हर आणि धारदार हत्याराने वार केले. कुसुमच्या छातीवर ३४ तर पाठीवर १६ वार करुन तो घटनास्थळावरून पळून गेला.
कुसुमचा ओढा हा ख्रिश्चन धर्माकडे होता आणि शाहबाज मुस्लिम असल्याने या प्रकरणाला लव्ह जिहादचं स्वरुप देण्याचाही प्रयत्न झाला. जेव्हा पोलिसांनी त्याला पकडल्यावर सर्व बाबी समोर आल्या. शाहबाज गुजरातहून विमानाने छत्तीसगडला पोहोचला होता. कुसुमच्या खोलीतून विमानाचे तिकीट मिळाल्याने या प्रकरणाचं गूढ उकललं.
एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, छत्तीसगडमध्ये दररोज तीन खून आणि तीन बलात्काराचे गुन्हे नोंदवले जात आहेत. २०२१ मध्ये राज्यात खुनाचे १०५७ आणि बलात्काराचे १०९३ गुन्हे दाखल झाले आहेत. जुन्या आकडेवारीशी तुलना करता, २०१८ मध्ये, राज्य बलात्काराच्या बाबतीत देशात पाचव्या स्थानावर होते आणि २०२१ मध्ये ते ११ व्या स्थानावर आले होते, अपहरण आणि दरोडेखोरीच्या बाबतीत परिस्थिती सुधारली आहे.