नवी दिल्ली: सरकारने १४ फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (FDCs) औषधांवर बंदी घातली आहे. यामध्ये निमसुलाइड आणि पॅरासिटामॉल डिस्पर्सिबल गोळ्या, क्लोफेनिरामाइन मॅलेट आणि कोडीन सिरप यांचा समावेश आहे. या औषधांचा वापर मानवी आरोग्यासाठी घातक ठरू शकतो, असे सरकारचे म्हणणे आहे. या औषधांचे वितरण, उत्पादन आणि विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. सरकारने शुक्रवारी जारी केलेल्या अधिसूचनेत ही माहिती दिली.तज्ज्ञ समितीच्या शिफारशींच्या आधारे सरकारने हे पाऊल उचलले आहे. ताप, डोकेदुखी, मायग्रेन, स्नायू दुखणे, दाताचे दुखणे, संधिवात दुखणे, स्पॉन्डिलायटिस, ऑस्टियोआर्थरायटिस, पीरियड वेदना, इत्यादींसाठी निमेसुलाइड आणि पॅरासिटामोलच्या कंपोझिशन असलेली औषधे दिली जातात. या औषधांच्या अनियंत्रित वापरामुळे यकृत, मूत्रपिंड आणि हृदयाच्या समस्या उद्भवू शकतात.

भरधाव जीपची टक्कर चुकवण्यासाठी वळवताना एसटी बस उलटली, ७ गंभीर जखमी, तर २३ प्रवाशांना लागला किरकोळ मार
या यादीत निमसुलाइड + पॅरासिटामोल डिस्पेर्सिबल टॅब्लेट, क्लोफेनिरामाइन मॅलेट + कोडीन सिरप, फोल्कोडाइन + प्रोमेथाझिन, अमोक्सिसिलिन + ब्रोमहेक्सिन आणि ब्रोमहेक्सिन + डेक्सट्रोमेथोरफान + अमोनियम क्लोराईड + मेन्थॉल, पॅरासिटामोल + ब्रोम्हेक्झिन + ग्लुफेनॅमिन + ग्लुफेनॅमिन + ग्लूफेन आणि ब्रोम्हेक्झिन या औषधांचा समावेश आहे. तज्ज्ञ समितीचे असे म्हणणे आहे की, अशी निश्चित डोस कॉम्बिनेशन औषधे मानवी आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे जनहिताच्या दृष्टीने त्यांच्यावर बंदी घातली पाहिजे. सरकारने औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायदा, १९४० अंतर्गत ही बंदी घातली आहे.

पाइपलाइनमध्ये राहिला, सिग्नलवर गजरे विकले, रस्त्यावरील दिव्याखाली अभ्यास केला, किरणची दहावीत चमकदार कामगिरी
२०१६ चा निर्णय

FDC औषधांना अशी औषधे म्हणतात ज्यात दोन किंवा अधिक API निश्चित प्रमाणात असतात. २०१६ मध्ये, सरकारने ३४४ औषधांच्या मिश्रणाचे उत्पादन, विक्री आणि वितरणावर बंदी घातली. तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ही समिती स्थापन केली होती. कोणत्याही वैज्ञानिक आकडेवारीशिवाय ही औषधे रुग्णांना विकली जात असल्याचे समितीने म्हटले आहे. या आदेशाला औषध कंपन्यांनी आव्हान दिले होते. ज्या १४ एफडीसींवर आता बंदी घालण्यात आली आहे ती त्याच ३४४ ड्रग कॉम्बिनेशनचा भाग आहेत.

भंडाऱ्यात अनोखा विवाहसोहळा; नवरीची धमाकेदार एन्ट्री, संविधानाची शपथ घेऊन बांधली लग्नगाठ, सर्वत्र होतंय कौतुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here