भुवनेश्वर: ओडिशा येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातात आतापर्यंत २८८ जणांचा मृत्यू झाला आहे तर ९०० जण जखमी झाल्याची माहिती आहे. येथे कोरोमंडल एक्स्प्रेस, मालगाडी आणि पॅसेंजर ट्रेनची धडक होऊन मोठा अपघात घडला. यावेळी कोरोमंडल एक्स्प्रेसचे १० ते १२ डबे रुळावरुन घसरले काही डबे थेट मालगाडीच्या वर चढले. या अपघातात अनेकांनी आपल्या कुटुंबातील सदस्य, मित्र, जवळचे व्यक्ती गमावले. कोरोमंडल रेल्वे अपघातात एकाच कुटुंबातील तीन भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा बसंती येथील रहिवासी हरण गायन, निशिकांत गायन, दिबाकर गायन अशी या तीन भावांची नावं आहेत. हे तिघेही भाऊ मजूर म्हणून काम करायचे आणि भात मळणीसाठी ते आंध्र प्रदेशकडे जायला निघाले होते. भात लावण्यासाठी ते यापूर्वीही अनेकदा आंध्र प्रदेशात गेले होते.

याशिवाय बसंती येथील चरणेखळी गावातील आणखी दोघांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. विकास हलदर आणि संजय हलदर अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. शुक्रवारी सकाळी नऊ वाजता हे दोघेही घरातून बाहेर पडल्याचे समोर आले आहे. या रेल्वे अपघातात बसंती आणि गोसाबा भागातील अनेक लोक जखमी झाले आहेत.

Odisha Train Accident: ही दुर्घटना नसून कट… माजी मंत्र्याची ओडिशा रेल्वे अपघातावर शंका, कारणही सांगितलं
२८८ जणांचा मृत्यू

ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातात २८८ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. तीन गाड्यांच्या या भीषण धडकेनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या अपघाताचा संयुक्त तपास अहवाल समोर आला आहे. या तपास अहवालात या भीषण घटनेमागे सिग्नलशी संबंधित बिघाड कारण असल्याचं समोर आलं आहे.

रिपोर्टनुसार, एक मालगाडी बहनगा बाजार स्टेशनवर लूप लाइनमध्ये उभी होती. दरम्यान, चेन्नईहून हावडाकडे जाणारी १२८४१ कोरोमंडल एक्सप्रेस बहनगा बाजार स्थानकावर पोहोचली. प्रत्येक स्टेशनवर दुसरी ट्रेन पास करण्यासाठी लूप लाइन असते.

मालगाडी कॉमन लूप लाइनवर उभी करण्यात आली

बहनगा बाजार स्टेशनवर अप आणि डाऊन अशा दोन लूप लाइन आहेत. एखाद्या ट्रेनला लूप लाइनवर तेव्हा उभं करण्यात येतं जेव्हा एखाद्या दुसऱ्या गाडीला स्टेशनवरून पास करायचं असते. बहनगा बाजार स्थानकावर कोरोमंडल एक्स्प्रेस आणि यशवंतपूर हावडा एक्स्प्रेस पास करण्यासाठी मालगाडीला लूप लाइनवर उभं करण्यात आलं होतं. कोरोमंडल एक्स्प्रेस मुख्य अप मार्गावरून भरधाव वेगाने जात होती. त्यावेळी यशवंतपूर-हावडा एक्स्प्रेसही डाऊन मार्गावरून जात होती. बहनगा बाजार स्थानकावर या गाड्यांना थांबा नाही. अशा स्थितीत दोन्ही गाड्यांचा वेग खूप जास्त होता. कोरोमंडल एक्स्प्रेसचा वेग १३० किलोमीटर प्रतितास होता. तेवढ्यात बहनगा बाजार स्थानकावरून जाणारी कोरोमंडल एक्स्प्रेस अचानक रुळावरून घसरली आणि रुळावरून घसरलेल्या कोरोमंडल एक्सप्रेसचे काही डबे मालगाडीला धडकले.

या अपघातावेळी डाऊन मार्गावरुन जाणाऱ्या ट्रेन क्रमांक १२८६४ यशवंतपूर-हावडा एक्स्प्रेसचे मागचे दोन डबे रुळावरुन घसरले आणि कोरोमंडल एक्स्प्रेसला धडकले. कोरोमंडल एक्स्प्रेसचे १२ डबे रुळावरून घसरले आणि तीन डबे डाऊन लाईनवर फेकले गेले. भुवनेश्वर रेल्वे स्थानकापासून सुमारे १७१ किमी आणि खरगपूर रेल्वे स्थानकापासून सुमारे १६६ किमी अंतरावर बालासोर जिल्ह्यातील बहंगा बाजार स्थानकाजवळ हा अपघात झाला.

आय एम सॉरी मम्मा, १२ वर्षांची लेक रडत-रडत आली, सत्य कळताच आईच्या पायाखालची जमीन सरकली
तातडीने रिलीफ व्हॅन पाठवली

अपघाताची माहिती मिळताच रेल्वे विभागाची धावपळ उडाली. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, माहिती मिळताच अपघात निवारण वैद्यकीय व्हॅन तसेच अपघात निवारण ट्रेन घटनास्थळी पाठवण्याचे आदेश देण्यात आले. खरगपूर, भद्रक, टाटानगर, संत्रागाची, खुर्दरोड आणि बालासोर स्थानकांवरून अपघात निवारण गाड्या आणि अपघात मदत वैद्यकीय व्हॅन घटनास्थळी रवाना करण्यात आल्या.

‘माणुसकीचा झरा’; रेल्वे अपघातानंतर रक्तदानासाठी लोकांची रांग

कोरोमंडल एक्स्प्रेसमध्ये १२०० हून अधिक प्रवासी होते

रात्री साडे आठ वाजता भद्रक येथून अपघातग्रस्त वैद्यकीय व्हॅन घटनास्थळी पोहोचली. अपघाताचा बळी ठरलेल्या ट्रेनमध्ये किती प्रवासी होते याचीही माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, कोरोमंडल एक्स्प्रेसमध्ये १२५७ प्रवाशांनी तिकीट काढले होते, तर १०३९ प्रवासी आरक्षण केल्यानंतर यशवंतपूर एक्स्प्रेसमध्ये प्रवास करत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here