विलास लाडे आणि महेश लांडगे हे भाचे जावई आहेत… मधल्या काळात महेश लांडगेंनी मामांच्या छत्र छायेखालीच काम केलं.. पण पुढे मामा भाचे आमनेसामने आले. विलास लांडे आणि महेश लांडगेंचा राजकीय संघर्ष पाहिला तर….
- विलास लांडे २००९ ला भोसरीतून अपक्ष आमदार झाले
- भोसरीचे पहिले आमदार म्हणून नावलौकिक मिळवला
- २०१४ ला भाचेजावयाई असलेल्या महेश लांडगेंकडून लांडेंना आव्हान
- अपक्ष लढत महेश लांडगेंची मामा विलास लांडेंवर मात
२००९ ला राष्ट्रवादीने तिकीट नाकारल्यावर विलास लांडे अपक्ष आमदार झाले खर…. पण त्यांच्या विजयाची पुनरावृत्ती महेश लांडगेंनीच हुकवली.
- २००४ ला महेश लांडगे पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत पहिल्यांदा नगरसेवक
- २००७, २०१२ लाही विजयी, स्थायी समिती अध्यक्ष पद सांभाळलं
- २०१४ ला राष्ट्रवादीकडे उमेदवारीची मागणी पण तिकीट नाकाल्यावर अपक्ष लढण्याचा निर्णय
- विधानसभेच्या विजयानंतर २०१६ ला भाजपमध्ये प्रवेश
- २०१७ ला पिंपरी चिंचवड महानरपालिकेत सत्ता खेचून आणण्यात सिंहाचा वाटा
- शिरूर लोकसभेसाठी भाजपकडून मोर्चबांधणी, महेश लांडगेंची लढण्याची तयारी
- पक्षाने विश्वास दाखल्यास लांडे-लांडगे भाचेजावयांमध्ये सामना होण्याची शक्यता
विलास लांडे भोसरीचे आमदार झाल्यावर महेश लांडगेंनी त्यांच्या नेतृत्वात काम केलं. पण महेश लांडगेंनी विधानसभेच्या उमेदवारीवर दावा केल्याने दोघांमध्ये अंतर वाढलं. राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्यावरही लांडगेंनी माघार न घेता झुंज दिली.. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात अजित दादांचा बोलबाला चालणाऱ्या भागात ताकद लावून राजकारण यशस्वी केलं. अजितदादांनी केलेल्या अपमान डोळ्यामोर ठेवला, जोराची लढाई केली आणि आमदारकीपाठोपाठ महानगर पालिकेत प्रस्थ निर्माण केलं. कधीकाळी समर्थक असलेले महेश लांडगे आता पिंपरी चिंचवडमध्ये अजित दादांनाच टक्कर देताना दिसतात.. लांडे आणि लांडगे लोकसभेच्या मैदानात उतरणार का? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.