मुंबईः केंद्रीय गृहमंत्री यांनी करोनावर मात केल्यानंतर पुन्हा अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अमित शहा उपचारांसाठी एम्समध्ये दाखल झाल्यानंतर काँग्रेसनं खोचक शब्दात त्यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेसनं ७० वर्षांत काय केलं, असा प्रश्न विचारतच अमित शहा दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल झाले आहेत, असा टोला काँग्रेसचे प्रवक्ते यांनी लगावला आहे.

‘पंडित जवाहरलाल नेहरु यांना दोष देत १९५६मध्ये बाळ नरेंद्र यांनी स्थापन केलेल्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये (एम्स) काँग्रेसनं ७० वर्षांत काय केलं असा सवाल करत अमित शहा उपचारांसाठी दाखल झाले आहेत. आम्ही त्यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी, यासाठी प्रार्थना करतो,’ असं ट्विट सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

वाचाः

दरम्यान, शुक्रवारी १४ ऑगस्ट या दिवशी त्यांचा करोना रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना होम आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. स्वत: अमित शहा यांनी ही माहिती दिली होती. आज त्यांना पुन्हा अंगदुखी आणि थकवा जाणवू लागल्यानंतर तातडीने पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एम्सचे डॉ. गुलेरिया यांच्या नेतृत्वातील डॉक्टरांचे पथक शहा यांच्यावर उपचार करत आहेत.

वाचाः

गेल्या ३ ते दिवसांपासून अमित शहा यांना थकवा जाणवत होता. तसेच त्यांना अंगदुखीचा देखील त्रास होत होता. करोनानंतरची काळजी घेण्यासाठी त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची तब्येत ठिक आहे. ते रुग्णालयातून आपली कामे करत आहेत, असे एम्सने म्हटले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here