पाटणा: बिहारच्या किशनगंज येथे दारु तस्करीचे वेगळेच प्रकरण समोर आले आहे. येथे एका व्हॅनमधून दारुची तस्करी केली जात होती. पोलिसांनी या व्हॅनमधून तब्बल ३७० लीटर दारु जप्त केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. जप्त केलेली दारू बंगालमधील डालकोला येथून सुपौल येथे नेली जात असल्याची माहिती आहे.

किशनगंज पोलिस ठाण्याच्या पथकाला दारू तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यावरुन दारूविरोधी सेलचे पथक पोलिस फौजफाट्यासह ब्लॉक चौकात वाहनांची तपासणी करण्यासाठी पोहोचले. तेव्हा त्यांना ‘सावधान! मुलं आहेत’, असं लिहिलेलं एक वाहन दिसले, पोलिसांना संशय आला आणि ते वाहून थांबवून तपासलं.

नको जाऊ गं… बापाने पाया पडल्या, विनवण्या केल्या, पण त्या निष्ठुर पोरीने काही ऐकलं नाही, अन्… पाहा VIDEO
यादरम्यान, तस्करांनी व्हॅनमध्ये तळघर केल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यात दारू भरलेली होती, ती पोलिसांनी जप्त केली. तसेच एका तरुणालाही अटक केली. त्याने पोलिस तपासात सांगितले की या व्हॅनमध्ये दारू भरून मोजबारी पूल ओलांडण्यास सांगितले होते. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपी वारंवार जबाब बदलत होता. दारू तस्करीचा हा जुगाड पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.

मुझफ्फरपूरमध्ये ३२५ लिटर दारू पकडली

मार्चच्या सुरुवातीला मुझफ्फरपूर पोलिस आणि बिहारमधील डीआययू पोलिसांनी संयुक्त छाप्यात ३२५ लिटर विदेशी दारू जप्त केली होती. ही दारू दोन आलिशान कारमधून नेली जात होती. तसेच घटनास्थळावरून पोलिसांनी ७ जणांना अटक केली होती. यामध्ये हरियाणातील दोन मोठे दारू माफिया सामील होते.

फेसबुकवरील प्रेम ‘लिव्ह इन’पर्यंत आलं, संशयाचं भूत डोक्यात शिरलं, एकाच वादात सगळं संपवलं!

डीआययूला दोन आलिशान कारमधून हरियाणातून दारूची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती. या गाड्या मुझफ्फरपूरमार्गे शिवहार आणि दरभंगा येथे जात होत्या. यानंतर डीआययू टीम आणि सदर पोलिस स्टेशनच्या टीमने जवानांसह नाकाबंदी केली. तेवढ्यात समोरून गाडी येत असल्याचे पाहून पोलिसांनी गाडी थांबवण्याचा इशारा केला. मात्र, तस्करांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांच्या पथकाने पाठलाग करून कारला थांबवलं. त्यात एक दारू तस्करही बसला होता, त्याच्या माहितीवरून पोलिसांनी दरभंगा आणि शिवहर भागात छापा टाकून दुसरी कारही पकडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here