जेहानाबाद: ज्या दारात काही तासात लेकीच्या लग्नाचं वऱ्हाड येणार होते, त्याच दारातून भावाची अंतयात्रा निघाली. ही हृदय पिळवटून टाकणारी घटना बिहारच्या जेहानाबाद येथे घडलं आहे. लेकीच्या लग्नाचा आनंद साजरा करत असलेल्या घरावर अचानक दु:खाचा डोंगर येऊन कोसळला. एकीकडे सगळे कुटुंबीय आणि नातेवाईक लग्नाच्या तयारीत गुंतलेले असताना अचानक गोळी चालण्याचा आवाज आला आणि परिसरात एकच कोलाहल माजला. या गोळीबारात तिघे जखमी झाले. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आणि हा होणाऱ्या वधूचा भाऊ होता.

हे संपूर्ण प्रकरण जेहानाबादच्या अमन गावाशी संबंधित असल्याची माहिती आहे. शनिवारी (३ जून) सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास ही गोळीबाराची घटना घडली आणि या घटनेत दोन जणांवर गोळीबार करण्यात आला. त्यात सुबोध नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले होते.

Crime News: सावधान आत लहान मुलं आहेत! व्हॅनवर संशय, उघडताच असं काही सापडलं की पोलिसही हादरले
यापैकी गंभीर जखमी असलेल्या एका तरुणाला गंभीर अवस्थेत पीएमसीएचमध्ये रेफर करण्यात आले आहे. या घटनेबाबत आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, क्रिकेट मॅच खेळताना वाद झाला होता आणि या वादातून ही घटना घडली आहे.

हा वाद आजचा नसून काही दिवसांपूर्वीचा आहे. मात्र, आज सर्व लोक लग्नाच्या तयारीत व्यस्त असताना ही घटना घडली. सुबोध कुमार असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून त्याच्या चुलत बहिणीचे लग्न होते. लग्नाचं वऱ्हाड नवरदेवासोबत शनिवारी येणार होते. त्यामुळे घरात तयारी चालली होती. सगळे लग्नाच्या कामात व्यस्त होते. सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. पण, क्षणात या आनंदावर विरजण पडलं.

फेसबुकवरील प्रेम ‘लिव्ह इन’पर्यंत आलं, संशयाचं भूत डोक्यात शिरलं, एकाच वादात सगळं संपवलं!

या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली. तर, लग्नघरावर शोककळा पसरली आहे. लग्नाच्या दिवशीच घरात तरुण पोराचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांची अवस्था वाईट आहे. या घटनेनंतर तात्काळ पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला असून तपास सुरु केला आहे. गुन्हेगारांना पकडल्यानंतरच या घटनेचं संपूर्ण सत्य कळेल असं पोलिसांनी सांगितलं आहे.

नको जाऊ गं… बापाने पाया पडल्या, विनवण्या केल्या, पण त्या निष्ठुर पोरीने काही ऐकलं नाही, अन्… पाहा VIDEO

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here