मुंबई : आयपीएल २०२३ मध्ये चेन्नई सुपरकिंग्जला चॅम्पियन बनवणारा धडाकेबाज स्टार ओपनर ऋतुराज गायकवाड आज शनिवारी विवाहबंधनात अडकला. चेन्नई सुपरकिंग्जसाठी या वर्षी शानदार कामगिरी करून दाखवणाऱ्या ऋतुराजने उत्कर्षा पवारसोबत लगीनगाठ बांधली. ऋतुराजने आपल्या विवाहाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

ऋतुराज गायकवाडची पत्नी उत्कर्षा गोलंदाज, तसेच फलंदाज देखील आहे. तिने आपला शेवटचा सामना नोव्हेंबर ०२१ मध्ये सीनियर विमेंस वनडे ट्रॉफीमध्ये पंजाबविरुद्ध खेळला होता. यंदाच्या आयपीएलमध्ये ऋतुराज आणि उत्कर्षा सोबत दिसले होते. आयपीएलची फायलन जिंकल्यानंतर उत्कर्षा पवारने महेंद्रसिंह धोनीचे चरणस्पर्श करत आशीर्वाद देखील घेतला होता. हा फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

Ruturaj Gaikwad weds Utkarsha

ऋतुराजचा उत्कर्षाशी विवाह

ऋतुराजने इंस्टाग्रामवर शेअर केले लग्नाचे फोटोयाच आठवड्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी ऋतुराज गायकवाडची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. मात्र, त्याने लग्नासाठी ब्रेक घेतला होता. ऋतुराजचे नाव टीम इंडियाच्या राखीव यादीत होते. ऋतुराज गायकवाडने स्वत: इंस्टाग्रामवर आपल्या लग्नाचे फोटो शेअर करत आपल्या लग्नाची आनंदवार्ता आपल्या चाहत्यांना दिली.

Ruturaj and Utkarsha

ऋतुराज आणि उत्कर्षा

महाराष्ट्रातर्फे क्रिकेट खेळली आहे उत्कर्षा

उत्कर्षा पवार ही महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळते. २४ वर्षीय उत्कर्षा मीडियम पेसर आहे. ती २०२१ मध्ये लिस्ट ए क्रिकेट खेळलेली आहे. त्यानंतर तिला संघात संधी मिळालेली नाही. पु्ण्याची रहिवासी असलेल्या उत्कर्षाने इंस्टीट्यूट ऑफ न्यूट्रीशन अँड फिटनेस साइंसेसमध्ये शिक्षण घेतले आहे. सध्या ती ट्रेंडमध्ये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here